ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी ही बातमी चांगली नाही. वास्तविक, त्यांचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ दुखापतग्रस्त झाला आहे, सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे स्मिथला मैदान सोडावे लागले. ॲडलेड कसोटीला 6 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत, त्याआधी स्मिथची दुखापत ही ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोनातून चांगली बातमी नाही. स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ मानला जातो.
ॲडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी, स्टार फलंदाज जखमी, सराव साडून गेला मैदानाच्या बाहेर
नेटमध्ये फलंदाजी करताना स्मिथच्या बोटाला दुखापत झाली. मार्स लॅबुशेन त्याला थ्रो डाउन देत असताना हा प्रकार घडला. दुखापत होताच स्मिथने आरडाओरडा केला, त्यानंतर नेटमध्ये वेळ घालवणे त्याच्यासाठी कठीण झाले आणि त्याला मैदान सोडावे लागले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फिजिओने स्मिथच्या दुखापतीचा आढावा घेतला, जो नेटच्या बाहेर होता. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑस्ट्रेलियासाठी दुखापतीची ही पहिलीच घटना नाही. याआधी जोश हेजलवूडच्या दुखापतीमुळे कांगारू संघाला मोठा धक्का बसला आहे. साईड स्ट्रेनमुळे ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाला या वेगवान गोलंदाजाची सेवा मिळणार नाही.
दुखापत होण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथने गुलाबी चेंडूने कसोटी सामना खेळण्याबाबत वक्तव्य केले होते. लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडू खेळताना अधिक लक्ष केंद्रित करावे लागते, असे तो म्हणाला होता. या चेंडूला न्याय देणे कठीण असते. लांब सीम आणि स्विंगमुळे गुलाबी चेंडूविरुद्ध फलंदाजी करणे सोपे नसते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेडमध्ये गुलाबी चेंडूची कसोटी खेळली जाणार असून, त्यासाठी दोन्ही संघ सरावात घाम गाळत आहेत. भारतीय संघाकडून चांगली बातमी अशी आहे की त्यांच्याकडून दुखापतीची चिंता नाही. रोहित शर्माच्या पुनरागमनाने संघाची ताकद वाढली आहे. भारतीय कर्णधार कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करतो, आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.