जन्मताच आई गमावली, ड्रग्जचा बळी, आमिर खानच्या चित्रपटामुळे या अभिनेत्याचे उजळले नशीब


बॉलीवूडच्या या चमकत्या दुनियेत दुरून सगळेच परफेक्ट आणि तेजस्वी वाटते, पण जसजसे तुम्ही जवळ जाल तसतसे तुम्हाला कळेल की तितकाच अंधार आहे, जितका उजेड आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे यश लोक आजही लक्षात ठेवतात, तर त्यांच्या मुलांनाही आपण एका यशस्वी स्टारचा मुलगा किंवा मुलगी असल्याचा फटका सहन करावा लागतो आणि अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी तितकेच यशस्वी होणे आवश्यक असते. अनेकजण ते करतातही… पण असे अनेकजण आहेत ज्यांच्यात प्रतिभा असूनही ते स्थान गाठता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याची गोष्ट सांगणार आहोत.

राज बब्बर यांची हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख आहे. राज बब्बर यांनी असे अनेक कल्ट चित्रपट दिले, जे आजही स्मरणात आहेत. स्मिता पाटील, राज यांची पत्नी आणि त्यांच्या काळातील एक उत्तम अभिनेत्री, तिच्या कला चित्रपट आणि चमकदार अभिनयासाठी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. पण राज आणि स्मिता इतके यश मिळवत असताना, त्यांच्या मुलाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आम्ही बोलत आहोत, राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरबद्दल.

आज प्रतीकचा 38 वा वाढदिवस आहे. ‘होसाना’ या गाण्यावरून प्रतीकला अनेकजण ओळखतात. पण प्रतीकचा संघर्ष आणि जीवन प्रवास क्वचितच कुणाला माहीत असेल. तो लाइमलाइटपासून लांब राहतो. 28 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईत जन्मलेल्या प्रतीक बब्बरचे संगोपन त्याच्या आजी-आजोबांनी केले. विशेष म्हणजे एकेकाळी प्रतीक त्याचे वडील राज बब्बरचा खूप तिरस्कार करत होता. प्रतीकने भलेही एकल चित्रपट केला नसेल, पण त्याने अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून आपली क्षमता नक्कीच सिद्ध केली आहे.

प्रतीकचे बालपण खूप कठीण गेले. आधी आईची सावली डोक्यावरून हरवली आणि मग अमली पदार्थांचे व्यसन, प्रतीकला खूप कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. प्रतिक बब्बरने अगदी लहान वयातच आई स्मिता पाटील हिला गमावले. याचे त्याला आजही दु:ख आहे. आई गेल्याने प्रतीकच्या आयुष्यात आलेला एकटेपणा त्याला पूर्णपणे आपल्या ताब्यात घेऊन चुकीच्या मार्गावर ढकलत गेला. तो अमली पदार्थांच्या व्यसनाला बळी ठरला.

प्रतीकने 2008 मध्ये बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. जाने तू या जाने ना या चित्रपटात त्याने जेनेलियाच्या भावाची भूमिका साकारली होती. त्याचे पात्र खूपच लहान होते, पण त्याचा लोकांवर वेगळा प्रभाव पडला. प्रतीकची व्यक्तिरेखा या चित्रपटात स्वतःच्याच एका वेगळ्या विश्वात राहते, प्रतीकचा त्या पात्राच्या कथेशी खूप संबंध असावा आणि म्हणूनच तो ती भूमिका इतक्या स्पष्टपणे साकारू शकला.

यानंतर एक दिवाना था आणि धोबी घाट यांसारख्या चित्रपटांतूनही त्याने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. त्यानंतर त्याने मुल्क, बागी 2 आणि छिछोरे यांसारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये काम करत राहिला. प्रतीकने सांगितले होते की, त्याच्या वाईट सवयींमुळे त्याचे करिअर खराब झाले होते, पण आता त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आहे.