
तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना यांच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. पुष्पाच्या कथेत पुढे काय होणार, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अल्लू अर्जुनची टीमही या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. पुष्पा 2 तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या 5 भाषांमध्ये रिलीज होणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का पुष्पा 2 चे शूटिंग कुठे झाले आहे? याबद्दलची आम्ही तुम्हाला देतो.
Pushpa 2 : सर्व काही ‘मेड इन इंडिया’ आहे, जाणून घ्या कुठे-कुठे झाले अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रुल’चे शूटिंग
पुष्पा 2 चे शूटिंग शेड्यूल 30 ऑक्टोबर 2022 रोजी हैदराबादमधून सुरू झाले. चित्रपटाचे पहिले शेड्यूल संपल्यानंतर दुसरे शेड्यूल जानेवारी 2023 मध्ये विशाखापट्टणममध्ये सुरू झाले. येथे पुष्पासोबत एकच ॲक्शन सीन शूट करण्यात आला. विशाखापट्टणम बंदरात 50 स्टंटमनसोबत शूट केलेला हा ॲक्शन सीक्वेन्स अतिशय स्फोटक आहे. या सीनमध्ये अल्लू अर्जुनला जमिनीपासून 100 फूट वर उलटा टांगण्यात आल्याचे ऐकायला मिळते.
Thank you Patna for all the love. 🖤 pic.twitter.com/KedCWpPC8g
— Allu Arjun (@alluarjun) November 18, 2024
जानेवारीमध्ये शूटिंग संपल्यानंतर दोन महिन्यांनी, म्हणजे मार्च 2023 मध्ये, अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्नासोबत चित्रपटाचे शूटिंग बंगळुरूमध्ये पुन्हा सुरू झाले. बंगळुरूमध्ये दोन शेड्युलमध्ये शूटिंग पूर्ण झाले. एप्रिल 2023 मध्ये, पुष्पा 2 चे जंगल सीक्वेन्स बहुतेक ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात शूट करण्यात आले होते. या शूटिंगसाठी या परिसरात राहणाऱ्या अनेक स्थानिकांचाही समावेश होता. ऑगस्ट 2023 नंतर या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग हैदराबादमध्येच झाले. पण मार्च 2024 मध्ये विशाखापट्टणम आणि आंध्र प्रदेशातील यगंती मंदिरात पुष्पा 2 चे काही महत्त्वाचे सीक्वेन्स शूट करण्यात आले. पुष्पा फिल्म फ्रँचायझी हा खरा ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प आहे. 1990 आणि 2000 च्या दशकात या चित्रपटात दिसणारे जपान आणि मलेशियाचे सेटही हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये बांधण्यात आले होते.
#KISSIK full song out tomorrow at 7:02PM. pic.twitter.com/KbJU19yUzS
— Allu Arjun (@alluarjun) November 23, 2024
प्रत्येक चित्रपटाप्रमाणे, ‘पुष्पा 2’ च्या टीमने देखील सेटवरून कोणताही व्हिडिओ लीक होऊ नये यासाठी पूर्ण लक्ष दिले. याच कारणामुळे अल्लू अर्जुनला या चित्रपटाच्या सेटवर मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नव्हती.
