
IPL 2025 च्या लिलावाच्या पहिल्या दिवशी 72 खेळाडू विकले गेले. या लिलावात ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांना 20 कोटींहून अधिक रक्कम मिळाली. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. लखनऊने त्याला 27 कोटींना खरेदी केले. श्रेयस अय्यरला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. व्यंकटेश अय्यरला केकेआरने 23.75 कोटींना विकत घेतले. पण काही खेळाडू असे होते, ज्यांचे मोठे नुकसान झाले.

आयपीएल 2025 च्या लिलावात मिचेल स्टार्कला सर्वात मोठा फटका बसला. गेल्या मोसमात स्टार्कला 24.75 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक रक्कम मिळाली होती, मात्र यावेळी तो खेळाडू 11.75 कोटी रुपयांना विकला गेला आहे. दिल्ली कॅपिटल्सने स्टार्कला आपलेसे केले. स्टार्कचे एकूण 13 कोटींचे नुकसान झाले.

आयपीएल 2025 च्या लिलावात केएल राहुलला खूप जास्त किंमतीला विकले जाईल अशी अपेक्षा होती पण या खेळाडूसोबत मोठा खेळ झाला. केएल राहुल केवळ 14 कोटींमध्ये विकला गेला, तो दिल्ली संघात सामील झाला. गेल्या मोसमापर्यंत केएल राहुलला 17 कोटी रुपये मिळाले होते, पण आता या खेळाडूला 3 कोटी रुपये कमी मिळणार आहेत.

लिलावात ग्लेन मॅक्सवेललाही चांगलाच फटका बसला. पंजाब किंग्जने या खेळाडूला 4.2 कोटी रुपयांना खरेदी केले. गेल्या मोसमात हा खेळाडू आरसीबीमध्ये 11 कोटींमध्ये खेळत होता. म्हणजे मॅक्सवेलला 6.8 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

आयपीएल लिलावात इशान किशनलाही वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. या हंगामात किशनला सनरायझर्स हैदराबादने 11.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गेल्या हंगामापर्यंत किशनला प्रत्येक हंगामात 15.25 कोटी रुपये मिळत होते.

गेल्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेल्या समीर रिझवीला यावेळी पुन्हा फक्त 95 लाख रुपये मिळाले आहेत. चेन्नईने गेल्या मोसमात समीर रिझवीवर 8.40 कोटी रुपये खर्च केले होते.
