
विराट कोहली भारत सोडून का गेला? विराट आता भारतात परतणार का? हा प्रश्न आहे, कारण अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या असे संकेत देत आहेत. विराट कोहलीने लंडनला आपले घर बनवले आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. अनेकदा प्रत्येक मालिकेनंतर विराट दिल्लीला नाही, तर लंडनला जातो. निदान गेल्या दीड वर्षात असेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे विराटचा भारताशी असलेला संबंध आता फक्त क्रिकेटपुरता मर्यादित आहे का? आणि जर होय असेल, तर त्यामागचे कारण काय?
कधीच भारतात परतणार नाही विराट कोहली? वसीम अक्रमने सांगितली हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
पर्थमध्ये विराट कोहलीची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने याबाबत वक्तव्य केले आहे. या भेटीत अक्रमला विराट कोहली आणि त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली. अक्रमने सांगितले, विराट आता इंग्लंडमध्ये का राहतो? वसीम अक्रमच्या म्हणण्यानुसार, विराट कोहलीने त्याला सांगितले की, इंग्लंडमध्ये त्याला सामान्य जीवन जगण्याचे आणि रस्त्यावर फिरण्याचे स्वातंत्र्य आहे.
अक्रम म्हणाला की, विराट कोहली हा भारतातील मोठा स्टार आहे. त्याचे लाखो चाहते आहेत, जे त्याला सतत रात्रंदिवस फॉलो करतात. विराट भारतात कुठेही गेला, तरी चाहते त्याला घेरतात. तर तो एकांतात राहणे पसंत करतो. प्रायव्हेसीच्या याच शोधामुळे त्याला भारत सोडण्यास भाग पाडले. वसीम अक्रमनेही या काळात त्याचे उदाहरण दिले. तो म्हणाला की, विराट इंग्लंडमध्ये कशासाठी राहत आहे आणि त्याची कारणे. ऑस्ट्रेलियात राहण्यासाठी त्याच्याकडेही अशीच कारणे आहेत.
पाकिस्तानचा माजी डावखुरा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये समालोचन करत आहे. तो हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये भाष्य करताना दिसत आहे. विराट कोहली कधी मोठी खेळी खेळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात तो विशेष काही करू शकला नाही.
