CNG Filling : सीएनजी भरताना गाडीतून का उतरावे लागते? तुम्हाला माहित आहे का उत्तर?


सीएनजी पंपावर गॅस भरण्यापूर्वी तुम्ही अनेकदा लोकांना त्यांच्या कारमधून बाहेर उभे असलेले पाहिले असेल. हे सगळेच करतात, पण असे प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात की असे का केले जाते? पेट्रोलप्रमाणे गाडीत बसून सीएनजी का भरला जात नाही?

सीएनजी गाड्यांबाबत खबरदारी न घेतल्यास स्फोट होण्याचा धोका असतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की असे का होते? सुरक्षिततेच्या कारणास्तव सीएनजी (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) भरताना वाहनातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो.

सीएनजी हा ज्वलनशील वायू आहे, जर गॅस भरताना कोणत्याही प्रकारची गळती होत असेल आणि त्यावेळी गाडीच्या आत कोणी बसले असेल, तर त्या गॅसमुळे त्या व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही, तर गॅस गळतीमुळे आग लागण्याचा धोकाही असू शकतो, त्यामुळेच वाहनातून बाहेर पडून उभे केले जाते.

कारमधून सर्व प्रवाशांना काढून टाकल्याने, वाहनाचे वजन कमी होते, ज्यामुळे सीएनजी भरण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ होते. जेव्हा तुम्ही कारमध्ये CNG भरता, तेव्हा पाईप 200 बार पेक्षा जास्त दाब देतो. अशा उच्च दाबामुळे, अगदी लहान क्रॅक देखील फुटू शकतात. त्यामुळेच सीएनजी भरताना गाडीत बसण्याऐवजी गाडीत बसलेल्यांना बाहेर पडण्यास सांगितले जाते.

सुरक्षेच्या कारणास्तव, सीएनजी वाहने चालवणाऱ्या लोकांना कारमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो. कारमधून बाहेर पडणे तुमच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे यात निष्काळजी राहू नका. लहानशा निष्काळजीपणामुळे स्फोट होऊन जीवितहानीही होऊ शकते.