टेरिफ महाग केल्यानंतर दूरसंचार कंपन्यांना सतत अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सप्टेंबर महिन्यासाठी ग्राहक डेटा जारी केला आहे. ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली, तर एक गोष्ट स्पष्ट होते की, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्ही या कंपन्यांची स्थिती खूपच टाईट आहे. दुसरीकडे, सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला फायदा होत आहे. सप्टेंबर महिन्यात टेलिकॉम कंपन्यांनी एक कोटीहून अधिक ग्राहक गमावल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे.
मुकेश अंबानींना झटका ! जिओची अवस्था Vi-Airtel पेक्षाही वाईट
भारती एअरटेलने सप्टेंबर महिन्यात 14 लाख ग्राहक गमावले, तर सप्टेंबर महिन्यात 15 लाख सदस्यांनी व्होडाफोन आयडिया अर्थात व्ही सोडले. मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला एअरटेल आणि व्होडाफोन आयडियापेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला आहे. सप्टेंबर महिन्यात जिओचे 79 लाख ग्राहक कमी झाले आहेत. याचाच अर्थ Airtel आणि Vodafone Idea च्या तुलनेत Jio ची अवस्था बिकट झाली आहे.
जर रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलला पुन्हा लोकांचा विश्वास जिंकायचा असेल, तर कंपनीला आपली रणनीती थोडी बदलण्याची गरज आहे. दरवाढीमुळे संतप्त युजर्स बीएसएनएलकडे वळत आहेत, कारण बीएसएनएलचे प्लॅन खूपच स्वस्त आहेत, यावरून हे स्पष्ट होते की जर Jio, Airtel आणि Vi ला ग्राहकांना पुन्हा नेटवर्कशी जोडायचे असेल, तर प्लॅन स्वस्त करावे लागतील. नाहीतर युजर्सना परवडतील, असे नवीन प्लान लॉन्च करावे लागतील, जे कमी किमतीत चांगले फायदे देतील.
एक काळ असा होता की प्रत्येकजण खाजगी कंपन्यांशी हातमिळवणी करत होता, पण दरवाढीनंतर सारा खेळच बदलून गेला आहे. एकीकडे Airtel, Jio आणि Vi ने टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली असताना दुसरीकडे BSNL ने कंपनी टॅरिफ वाढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळेच हळूहळू लोक बीएसएनएल नेटवर्कशी जोडले जाऊ लागले. ग्राहक गमावण्याऐवजी, बीएसएनएलने सप्टेंबरमध्ये नेटवर्कमध्ये 8 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.