Box Office Day 1 : अजय देवगण-कार्तिक आर्यनसमोर टिकू शकले नाहीत सूर्या आणि बॉबी देओल! ‘कांगुवा’ने पहिल्या दिवशी केली एवढ्याच कोटींची कमाई


चाहते सूर्या आणि बॉबी देओलच्या ‘कांगुवा’ची वाट बघत होते. ‘कांगुवा’ 14 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. चित्रपटाच्या कथेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. समीक्षकही ‘कांगुवा’वर संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसले. अशा परिस्थितीत आता सर्वांच्या नजरा सूर्या आणि बॉबी देओलच्या ‘कांगुवा’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईकडे लागल्या आहेत. दरम्यान चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.

‘कांगुवा’ रिलीज होण्यापूर्वीच चर्चेत होता. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग पाहिल्यानंतर पहिल्याच दिवशी ‘कांगुवा’ कमाईच्या बाबतीत झेंडा रोवेल असा अंदाज बांधला जात होता. पण सूर्या आणि बॉबी देओलचा चित्रपट अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ आणि कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ कडून मात खाताना दिसत आहे. सॅकनिल्क च्या अहवालानुसार, ‘कांगुवा’ने पहिल्याच दिवशी 22 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ही आकडेवारी अद्याप प्राथमिक असली तरी. ‘कांगुवा’च्या कमाईत थोडी वाढ होऊ शकते. पण कितीही बदल झाले, तरी एक मात्र नक्की की पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत ‘कांगुवा’ ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया 3’च्या मागे पडला आहे. 1 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या अजय देवगण आणि कार्तिक आर्यनच्या सिनेमांनी रिलीजच्या पहिल्याच दिवशी चांगला व्यवसाय केला. ‘सिंघम अगेन’ने पहिल्याच दिवशी 43 कोटी रुपयांची कमाई केली होती.

तर कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल 35.5 कोटींची कमाई केली होती. अशा परिस्थितीत या दोन चित्रपटांच्या तुलनेत ‘कांगुवा’ची कमाई फारच कमी दिसते. काल ‘कांगुवा’ची आगाऊ बुकिंग 2,33,826 वर पोहोचली होती. शिवाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मात्र, या चित्रपटाकडून पहिल्याच दिवशी 40 कोटींची कमाई सहज होईल, अशी अपेक्षा होती. पण 40 ची अर्धी कमाई पाहून निर्मात्यांचीही थोडी निराशा झाली असेल. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 300 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.