सनी, बॉबी की अभय देओल, या तिघांमध्ये कोण आहे सर्वात श्रीमंत?


देओल कुटुंब हे चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या दोन्ही मुलांनी म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओलनेही बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले आहे. धर्मेंद्र यांचा भाऊ आणि निर्माता अजित देओल यांचा मुलगा अभय यानेही चित्रपटांमध्ये आपली कारकीर्द गाजवली आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभय देओल हा सनी आणि बॉबीचा चुलत भाऊ असला, तरी त्यांच्यातील प्रेम अगदी भावासारखे आहे. हे तिघेही अनेक वर्षांपासून चित्रपटात काम करत आहेत. तिघांनीही आपल्या मेहनतीने नावासोबतच भरपूर पैसा कमावला आहे. एकूण संपत्तीच्या बाबतीत या तिघांमध्ये कोण आघाडीवर आहे ते जाणून घेऊया.

देओल कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा सनी देओलपासून सुरुवात करूया. गेल्या 41 वर्षांपासून तो लोकांचे मनोरंजन करत आहे. त्याने ‘गदर’, ‘घातक’, ‘घायल’ असे अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. रिपोर्ट्सनुसार सनीची संपत्ती 130 कोटी रुपये आहे.

बॉबी देओलने 2023 साली प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून जबरदस्त बाउन्स बॅक केला आहे. आता खलनायक म्हणून त्याच्या कारकिर्दीचा नवा टप्पा सुरू झाला आहे. साऊथच्या ‘कांगुवा’ चित्रपटातही तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. बॉबीलाही आजकाल कशाचीच कमतरता नाही. रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 66 कोटी रुपये आहे.

आता अभय देओलबद्दल बोलूया. सनी आणि बॉबीच्या अभिनयात अभय तितका यशस्वी नसला, तरी त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही. फॉरबिडन फिल्म्स या नावाने त्याची निर्मिती कंपनी आहे. त्याचे एक रेस्टॉरंटही आहे. त्याच्याकडे 400 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे अहवालात म्हटले आहे.