New Apple Stores : ताबडतोब कमाईनंतर ॲपलने घेतला हा मोठा निर्णय, जाणून घ्या तुमच्यावर काय होईल परिणाम?


ॲपल आयफोनचे लोकांमध्ये खूप मोठी क्रेझ आहे, नवीन आयफोन लॉन्च झाल्यानंतर सेल सुरू होण्यापूर्वीच दुकानांबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच सांगितले की, जगभरात आयफोनची विक्री वाढली आहे, ॲपलने भारतातही खूप चांगली कमाई केली आहे.

आयफोनच्या विक्रीत वाढ झाल्यानंतर ॲपलने निर्णय घेतला आहे की कंपनी आता ग्राहकांसाठी चार नवीन स्टोअर उघडण्याची तयारी करत आहे. असे झाल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल, कारण तुमच्या शहरात ॲपलचे नवीन स्टोअर उघडले, तर तुम्हाला आयफोन किंवा ॲपलची उत्पादने खरेदी करताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. सध्या दिल्लीत एक आणि मुंबईत एक दुकान आहे. ॲपलचे नवीन स्टोअर्स उघडणार असल्याची बातमी नवीन नसली, तरी वृत्तानुसार कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी याला दुजोरा दिला आहे.

दिल्ली आणि मुंबईनंतर कोणत्या राज्यात नवीन ॲपल स्टोअर्स सुरू होतील याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. वृत्तानुसार, पुणे, बंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्ये ॲपलचे नवीन स्टोअर सुरू केले जाऊ शकतात. काउंटरपॉइंट रिसर्चनुसार, ॲपलचा सध्या भारतीय स्मार्टफोन बाजारात मूल्यानुसार 22 टक्के हिस्सा आहे.

सणासुदीच्या आधी आयफोन 16 सीरीज लाँच केल्याने ऍपलची बाजारपेठ आणखी मजबूत झाली आहे. जागतिक स्तरावर, Apple ने सप्टेंबर तिमाहीत $94.9 अब्ज कमाई केली, जी वार्षिक 6 टक्के वाढ दर्शवते. आयफोनचा महसूलही 6 टक्क्यांनी वाढला आहे. काही काळापूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता की लवकरच भारतात उत्पादित होणारे iPhone 16 Pro Max आणि iPhone 16 Pro देखील ग्राहकांना उपलब्ध होतील.