गॅम्बलिंग डिसऑर्डर म्हणजे काय, लाखो लोक पडत आहेत त्याला बळी, असे अभ्यासातून आले आहे समोर


जुगार हे व्यसन देखील बनू शकते. अशा व्यसनामुळे व्यक्तीला मानसिक ताण येऊ शकतो आणि आत्महत्याही करु शकतो. जुगाराच्या व्यसनाच्या संदर्भात नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जुगारामुळे आत्महत्या होऊ शकते. जेव्हा जुगार हा आजार बनतो आणि त्यामुळे मानसिक समस्या निर्माण होऊ लागतात, तेव्हा वैद्यकीय भाषेत त्याला गॅम्बलिंग डिसऑर्डर म्हणतात. आश्चर्याची बाब म्हणजे जगभरात 80 दशलक्ष तरुण गॅम्बलिंग डिसऑर्डरचे बळी आहेत.

गॅम्बलिंग डिसऑर्डर हे व्यसनासारखे आहे, जे मानसिक आरोग्याच्या स्थितीशी देखील जोडले जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीला जसे ड्रग्सचे व्यसन लागते, त्याचप्रमाणे या व्याधीमध्ये व्यक्तीला जुगाराचे व्यसन लागते. हे व्यसन इतके वाईट असते की माणूस सर्वस्व गमावूनही जुगार खेळत राहतो. यामुळे त्याला अनेकदा अनेक वाईट आर्थिक आणि सामाजिक परिणामांना सामोरे जावे लागते. व्यक्ती गरीब होते आणि त्याचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्यही बिघडते.

द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जगभरात अंदाजे 80 दशलक्ष तरुण जुगाराच्या विकाराला बळी पडले आहेत. या विकारामुळे व्यक्तीला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आणि आर्थिक नुकसानासोबतच कौटुंबिक व नातेसंबंधात भांडणे, आत्महत्या, कौटुंबिक हिंसाचार आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतात. जुगाराचे व्यसन माणसाला गुन्हेगारीकडेही ढकलू शकते. जुगाराच्या व्यसनामुळे होणाऱ्या विकाराचे परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात, असे या अभ्यासात म्हटले आहे.

या विकाराच्या लक्षणांबद्दल सांगायचे तर, एखाद्या व्यक्तीला जुगाराचे इतके व्यसन लागते की तो आपल्या नफा-तोट्याचा विचार न करता सतत जुगार खेळण्याचा विचार करतो. यासाठी तो घराच्या आत आणि बाहेर चोरी करण्यास मागेपुढे पाहत नाही आणि अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये अडकतो. त्यामुळे अनेकवेळा त्याला अंमली पदार्थांचे व्यसनही जडते. ज्याचे अनेक घातक परिणाम होतात. या विकारामुळे माणूस जुगार खेळण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तो स्वत:ला किंवा त्याच्या ओळखीच्या एखाद्याला हानी पोहोचवू शकतो.

या अहवालानुसार, 80 दशलक्ष लोक गॅम्बलिंग डिसऑर्डरचे बळी आहेत आणि ते कोणत्या ना कोणत्या जुगारात गुंतलेले आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी मोबाईल गेमिंगपासून ते कॅसिनोपर्यंत सर्व प्रकारच्या जुगारांचा समावेश आहे.

कसा टाळता येईल हा विकार

  • या व्याधीचे व्यसन असलेल्या व्यक्तीने मानसिक आरोग्य तज्ज्ञाकडून समुपदेशन करून घ्यावे.
  • त्याचे दुष्परिणाम सांगा.
  • या विकारातून मुक्त होण्यासाठी त्याला पूर्ण सहकार्य करा.
  • भांडण न करता त्याच्या भावना ऐका आणि त्याला प्रेमाने समजून घेण्याचा प्रयत्न करा.
  • योग आणि ध्यानाची मदत घेण्याचा सल्ला द्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही