
Jio, Airtel आणि Vi चे टेन्शन वाढवण्यासाठी BSNL ने एक शानदार दिवाळी ऑफर आणली आहे. कंपनीने त्यांच्या दीर्घ वैधता 1999 रुपयांच्या प्लॅनची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत साईटवर या दिवाळी गिफ्टची माहिती दिली आहे.
BSNL Diwali Offer : 600GB डेटा आणि 365 दिवसांची वैधता, या रिचार्ज प्लॅनची किंमत झाली 100 रुपयांनी कमी
BSNL 1999 Plan Details
1999 रुपयांच्या या BSNL प्लॅनवर 100 रुपयांची सूट उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर हा प्लान आता 1899 रुपयांना खरेदी करता येईल. फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या प्लॅनसह, वापरकर्त्यांना 600 GB हाय स्पीड डेटा आणि 365 दिवसांची वैधता मिळेल.
या प्लॅनमध्ये 600 GB डेटा व्यतिरिक्त, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS देखील दिले जातील. दीर्घ वैधता आणि कमी किंमतीसह हा प्लॅन तुमचे सिम एक वर्षासाठी सक्रिय ठेवण्यास देखील मदत करेल.
Jio 1899 Plan Details
रिलायन्स जिओचा देखील 1899 रुपयांचा प्लॅन आहे, परंतु हा प्लॅन 365 ऐवजी 336 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी हायस्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि 3600 एसएमएस देण्यात आले आहेत. तसेच, या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cloud आणि Jio Cinema सारख्या ॲप्सवर मोफत प्रवेश मिळतो.
एअरटेल 1999 Plan Details
एअरटेलकडे प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 1999 रुपयांची वार्षिक योजना आहे, जी 365 दिवसांची वैधता देते. 24 GB डेटाच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 SMS आणि अमर्यादित मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनसह, Apollo 24/7, Wynk Music, Spam Protection आणि Extreme Play सारखे फायदे उपलब्ध आहेत.
Vi 1999 Plan Details
Vodafone Idea अर्थात Vi च्या 1999 रुपयांच्या प्लॅनसह, प्रीपेड वापरकर्त्यांना 24 GB डेटा, 3600 SMS आणि मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो.
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे, जी 28 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या दिवाळी ऑफरचा लाभ पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत म्हणजेच 7 नोव्हेंबरपर्यंत घेता येईल.
