एकेकाळी रेल्वे ट्रॅकवरील कोळसा गोळा करायचा हा अभिनेता, 300 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम


चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र, प्रत्येकाचे हे स्वप्न पूर्ण होत नाही. असे काही लोक असतात, जे आपले गंतव्यस्थान गाठण्यासाठी हार मानत नाहीत आणि एक दिवस ते त्या गंतव्यापर्यंत पोहोचतात. ओम पुरी देखील असेच एक अभिनेते होते, ज्यांनी कधीही हार मानली नाही आणि ते बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक बनले.

ओम पुरी आज या जगात नसले, तरी त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले आहेत आणि विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, ज्यासाठी ते नेहमीच लक्षात राहतात. 18 ऑक्टोबर रोजी त्यांची जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत.


ओम पुरी यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात कन्नड सिनेमातून केली होती. 1975 मध्ये आलेला ‘कल्ला कल्ला बचितको’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटानंतर त्यांनी कन्नड तसेच मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, मल्याळम, तेलगू, इंग्रजी, हिंदी अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी आपल्या करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटात काम केले होते. इंडस्ट्रीत मोठ्या पदावर असतानाही त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचे बालपण गरिबीत गेले.

ओम पुरी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. अहवालानुसार, जेव्हा ते पाच वर्षांचे होते, तेव्हा ते रेल्वे ट्रॅकवरचा कोळसा गोळा करत असे आणि ते आपल्या घरी आणत असे, ज्याने त्यांची आई जेवण बनवायची. इतकेच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते चहाच्या दुकानात काम करायचे.

रिपोर्ट्समध्ये असंही म्हटले जाते की, कॉलेजच्या दिवसांमध्ये ते लॅब असिस्टंट म्हणून काम करायचे आणि संध्याकाळी ट्यूशनही शिकवायचे. असेही म्हटले जाते की, त्यांचे कॉलेज त्यांच्या घरापासून 30 किलोमीटर अंतरावर होते आणि ते सायकलवरून ते अंतर पार करत असे. कॉलेजच्या दिवसांतच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली, असे म्हटले जाते आणि तिथूनच त्याचा बॉलिवूडच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि या जगातून गेल्यावरही लोक त्यांची आठवण काढतात हे निश्चित.