आधी धक्का बसला, मग नकार… एकाच भेटीनंतर झाले रेखा यांचे लग्न


रेखा यांनी आपल्या अभिनय आणि सौंदर्याने इंडस्ट्रीवर दीर्घकाळ राज्य केले आहे. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंतच्या गोष्टींमध्ये लोकांना खूप रस आहे. मात्र, रेखा यांचे नाव अनेक अभिनेत्यांशीही जोडले गेले आहे, ज्यात अमिताभ बच्चन आणि विनोद मेहरा यांच्या नावाचाही समावेश आहे. रेखा यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या लग्नाशी संबंधित आहे. एका जुन्या मुलाखतीत रेखा यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल मोकळेपणाने बोलले होते.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांची नावे बऱ्याच वर्षांपासून जोडली जात होती, पण दरम्यानच्या काळात अशा अनेक अफवा पसरू लागल्या. या अफवा थांबवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 1990 मध्ये त्यांनी दिल्लीतील बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत अरेंज मॅरेज केले होते. लग्नापूर्वी दोघेही एकदाच भेटले होते. दोघेही त्यांच्या मित्रामुळे भेटले.

सिमी गरेवालच्या शोमध्ये रेखा यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितले. रेखा यांनी सांगितले की, दोघांचेही अरेंज्ड मॅरेज झाले होते, मुकेशला त्या एकदाच भेटल्या होत्या आणि जेव्हा दोघांचे लग्न झाले होते, तेव्हा ती दुसरी भेट होती. असा सवाल करत सिमीने विचारले की, तुम्ही एका अनोळखी व्यक्तीशी लग्न केले, मला जाणून घ्यायचे आहे की दोन पूर्णपणे भिन्न लोक एकमेकांच्या नात्यात कसे येतात. यावर प्रतिक्रिया देताना रेखा म्हणाल्या की, आम्ही काही पहिले जोडपे नव्हतो, हे सर्व नशिबाने घडते, ही जीवनातील एक रिस्क असते.

मात्र, 6 महिन्यांनी मुकेशने आत्महत्या केली, त्यानंतर काही लोकांनी त्यांच्या मृत्यूसाठी रेखा यांना जबाबदार धरण्यास सुरुवात केली. काही लोकांनी मुकेशला नैराश्याने ग्रासल्याचे सांगितले. याविषयी बोलताना रेखा म्हणाल्या, ही बातमी ऐकून आधी मला धक्काच बसला होता, नंतर एक टप्पा आला, जेव्हा मी माझ्यासोबत हे घडले आहे, हे नाकारू लागले.

लग्नाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही येऊ लागल्या. मुकेशच्या मृत्यूनंतर रेखा यांच्या घटस्फोटाच्या वृत्तावर मौन सोडले आणि सांगितले की, मला घटस्फोट नको होता, उलट मुकेशनेच त्यांच्याकडून घटस्फोट मागितला होता. त्यानंतर रेखा यांचे नाव अभिनेता विनोद मेहरासोबत जोडले जाऊ लागले, एवढेच नाही तर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या.