Miss India 2024 : मिस इंडिया ते मिस वर्ल्ड… भारताच्या या सुंदरींना मिळाला आहे मिस वर्ल्डचा मुकूट


बुधवार 16 ऑक्टोबर रोजी रात्री फेमिना मिस इंडियाच्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यंदा मध्य प्रदेशच्या निकिता पोरवालने मिस इंडियाचा ताज पटकावला आहे. आता ती मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. दादरा आणि नगर हवेली (केंद्रशासित प्रदेश) ची रेखा पांडे फर्स्ट रनर अप, तर गुजरातची आयुषी ढोलकिया सेकंड रनर अप ठरली.

मूळची उज्जैनची असलेली निकिता पोरवाल ही पहिली टीव्ही अँकर होती. आता मिस वर्ल्डच्या जागतिक स्पर्धेत भारताला निकिताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तथापि, येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की फेमिना मिस इंडिया जिंकल्यानंतर कोणत्या भारतीय सुंदरी मिस वर्ल्डचा किताब जिंकू शकल्या.

रीता फारिया
रीता फारिया मिस वर्ल्ड जिंकणारी पहिली भारतीय होती. 1966 मध्ये लंडनमध्ये तिने मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता. मात्र, वर्षभरानंतर तिने मॉडेलिंग आणि चित्रपटांना नकार दिला. तिने वैद्यकीय अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. रीता फारिया ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जे.जे. ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सची विद्यार्थी होती.

ऐश्वर्या बच्चन
1994 मध्ये बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय मिस वर्ल्डचा ताज जिंकणारी दुसरी भारतीय होती. ऐश्वर्या राय विजेती आणि सुष्मिता सेन उपविजेती ठरली होती. पण सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा मुकुट पटकावला.

डायना हेडन
1997 मध्ये डायना हेडनने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ती तिसरी मिस इंडिया होती. डायना हेडन अभिनेत्री, मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट आहे. मात्र, ती चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरली.

युक्ता मुखी
दोन वर्षांनंतर भारताला चौथी मिस वर्ल्ड झाली. 200 मध्ये युक्ता मुखीने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. ग्लॅमरच्या दुनियेतही तिची कारकीर्द काही कामी आली नाही.

प्रियांका चोप्रा
ग्लोबल आयकॉन बनलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राने 2004 साली मिस वर्ल्डचा किताब पटकावला होता. बॉलीवूडमध्ये यशस्वी झाल्यानंतर हॉलिवूडमध्येही तिची कारकीर्द सुरु झाली.

मानुषी छिल्लर
2017 मध्ये भारताच्या मानुषी छिल्लरने मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता. मानुषी छिल्लर ही वैद्यकीय विद्यार्थिनी होती. मानुषी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग आहे.