आधी त्याने पाकिस्तानी गोलंदाजांना धुतले, मग त्या मैदानात सुकायला टाकली अंडरवेअर, मुलतानमध्ये हे काय चालले आहे?


पाकिस्तानविरुद्ध इंग्लंड संघाने पहिल्या डावात 150 षटकांत 823 धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूकने 317 धावांची, तर जो रूटने 262 धावांची खेळी खेळली. इंग्लंडने पहिल्या डावात पाकिस्तानवर 267 धावांची मोठी आघाडी घेतली आहे. मात्र, इंग्लंडचा डाव संपत असताना त्याचा फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुटने असे काही केले, जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जो रूटने मुलतानच्या मैदानावर आपले कपडे सुकायला टाकले. जो रूटने फलंदाजी करताना घातलेले कपडे घामाने भिजले होते आणि मग या खेळाडूने ते सीमारेषेवर सुकायला टाकले.

फलंदाजीनंतर जो रूटने इंग्लंड पॅव्हेलियनजवळील सीमारेषेवर घामाने भिजलेले कपडे सुकवले. त्याने मैदानावर आपली जर्सी, पायघोळ आणि अगदी अंडरवेअर सुकवले. जो रूटचा कपड्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://x.com/TheBarmyArmy/status/1844281515188133945?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1844281515188133945%7Ctwgr%5E55933b6a27940a0073609607ef87fb96e5911b01%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fjoe-root-clothes-dry-multan-stadium-pakistan-vs-england-1st-test-2879663.html
जो रूटबद्दल बोलायचे झाले तर या खेळाडूने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या डावात रुटने 375 चेंडूत 262 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 17 चौकार आले. एवढेच नाही, तर हॅरी ब्रूकसोबत 454 धावांची भागीदारी केली. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

पाकिस्तानविरुद्ध जो रूटचे हे द्विशतक खूप खास आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि भारतामध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला बिगर आशियाई फलंदाज आहे. रुटला इंग्लंडमध्ये धावा करणारा फलंदाज म्हटले जाते, पण या खेळाडूची दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, यूएई, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी आहे. तर भारतात तो 45 पेक्षा जास्त सरासरीने धावा करतो.