
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार ONGC च्या अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करू शकतो. या भरती प्रक्रियेअंतर्गत कंपनीत एकूण 2237 पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोंदणी प्रक्रिया 5 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर ही निश्चित करण्यात आली आहे.
ONGC Apprentice Recruitment : ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक शिकाऊ पदांसाठी भरती, नोंदणी सुरू
लक्षात ठेवा या तारखा
- अर्ज करण्याची तारीख सुरु – 5 ऑक्टोबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 25 ऑक्टोबर 2024
- निकालाची तारीख/निवड- 15 नोव्हेंबर 2024
कुठे आणि किती भरती?
- उत्तर विभाग – 161 पदे
- मुंबई विभाग – 310 पदे
- पश्चिम विभाग – 547 पदे
- पूर्व विभाग – 583 पदे
- दक्षिण विभाग – 335 पदे
- सेंट्रल विभाग – 249 पदे
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 25.10.2024 पर्यंत 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी म्हणजेच उमेदवार/अर्जदाराची जन्मतारीख 25.10.2000 ते 25.10.2006 दरम्यान असावी.
या पदांसाठी उमेदवारांची निवड जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. दोन उमेदवारांचे गुण समान असल्यास त्याहून अधिक वय असलेल्या उमेदवाराचा विचार केला जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की नोकरीत रुजू होण्यापूर्वी त्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यात काही तफावत आढळल्यास त्यांची निवड रद्द केली जाऊ शकते.
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ही एक सरकारी कंपनी आहे, जी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीची आहे. ONGC ची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी भारत सरकारने केली, ज्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. हे देशातील सर्वात मोठे तेल आणि वायू शोधक आणि उत्पादक आहे, जे भारताच्या कच्च्या तेलाच्या देशांतर्गत उत्पादनापैकी सुमारे 70 टक्के आणि नैसर्गिक वायूचे सुमारे 84 टक्के उत्पादन करते. याला शासनाकडून महारत्न कंपनीचा दर्जा प्राप्त झाला आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही ONGC ongcindia.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
