एकेकाळी राजेश खन्ना यांच्या घराचा एसी दुरुस्त करायचा इरफान खान, त्यानंतर चमकले त्याचे नशीब आणि तो झाला स्टार


मोठ्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खान आता या जगात नाही. इरफान खान आता या जगात नसला, तरी त्याच्या अभिनयामुळे सर्वजण त्याला ओळखतात. 29 एप्रिल 2020 रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. सामान्य माणूस ते बॉलीवूड स्टार होण्याचा त्याचा प्रवास खूप कठीण आहे. इरफान खानवर एक काळ असा होता, जेव्हा तो टेक्निशियन होता.

इरफान खानने कधीच विचार केला नव्हता की तो एका टेक्निशियनपासून इतका मोठा स्टार होईल. त्यादरम्यान त्याची भेट राजेश खन्ना यांच्याशी झाली आणि त्याचे नशीबच पालटले. इरफान खाननेच खुलासा केला होता की, तो एकदा राजेश खन्ना यांच्या घरी एसी दुरुस्त करण्यासाठी गेला होता.

दिवंगत अभिनेता इरफान खानने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, जयपूरमध्ये राहून त्याने आपला खर्च भागवण्यासाठी तांत्रिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इरफान मुंबईत आला. मुंबईत आल्यानंतर त्यांना एका कंपनीच्या वतीने फिल्डवर कामाला जावे लागायचे.

यावेळी त्याने अनेक घरांना भेटी दिल्या आणि एकदा त्याला बॉलिवूड स्टार राजेश खन्ना यांच्या घरातील एसी ठीक करण्याची संधी मिळाली. याबद्दल बोलताना, अभिनेता म्हणाला होता, “मला आठवते की एका भावाने दरवाजा उघडला आणि त्याने मला विचारले कोण? तर मी म्हणालो AC टेक्निशियन आणि तो म्हणाला ये. अशा प्रकारे मी राजेश खन्ना यांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतरच मी ठरवले की मलाही अभिनेता व्हायचे आहे.”

तो पुढे म्हणाला, मग मी पुन्हा मुंबईहून जयपूरला गेलो आणि काही काम करायचे होते. माझ्या वडिलांनी माझी कोणाशी तरी ओळख करून दिली आणि पंखे दुरुस्त करण्यासाठी मला पंख्याच्या दुकानात बसवले. तेव्हा मला समजले की मी फक्त पैसे कमवण्यासाठी काम करू शकत नाही.

यानंतर त्याने 1987 मध्ये एनएसडीमधून पदवी घेतली आणि त्यानंतर कामाच्या शोधात सुरुवात केली. इरफान खानने ‘सलाम बॉम्बे’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, यात त्याची भूमिका फारच छोटी होती आणि तीही फायनल कटनंतर काढून टाकण्यात आली. यानंतर 1990 मध्ये ‘एक डॉक्टर की मौत’ या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली.