सध्या डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, फ्लू आणि व्हायरल फिव्हरचा हंगाम सुरू आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात लोक बळी पडत आहेत. हे सर्व आजार तापाने सुरू होतात. वयोवृद्धांपासून ते लहान मुलेही तापाला बळी पडत आहेत. ताप आल्यावर बहुतेक लोक पॅरासिटामॉल औषध घेतात. यामुळे आरामही मिळतो. कुटुंबातील काही लोक लहान मुलांना ताप आल्यावर हेच औषध देतात, पण पॅरासिटामॉल मुलांना द्यायचे का? विशेषत: ज्यांचे वय 10 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांना हे औषध देणे योग्य आहे का? जाणून घ्या याबद्दल.
जास्त ताप असेल तर मुलांना द्याव्यात की नाही पॅरासिटामॉलच्या गोळ्या? काय आहेत त्याचे तोटे, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) नुसार, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना त्यांचे वय आणि वजन लक्षात घेऊन तापाचे औषध दिले पाहिजे. ताप आल्यास लगेच कोणतेही औषध देणे टाळावे. जर मुलाचा ताप 100 ते 102 अंशांच्या आसपास असेल, तर मुलाचा ताप कमी करण्यासाठी कोमट पाण्याने स्पॉन्ग करा. यासाठी मुलाचे कपाळ, मान आणि छाती सुती कापडाच्या साहाय्याने हलक्या हाताने घासू शकता. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होऊ शकते. या पद्धतीमुळे आराम मिळत नसेल, तर काही औषध द्यावे.
पॅरासिटामॉलच्या गोळ्यांऐवजी मुलाला सिरप देणे चांगले. 6 वर्षाखालील मुलांसाठी, सिरपमध्ये 120 मिलीग्राम पॅरासिटामॉल असते. 6+ म्हणजेच 6 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना 250 मिलीग्राम पॅरासिटामॉल सिरप द्यावे. 8 ते 9 वर्षांसाठी 7.5 मि.ली. सिरपचा डोस द्यावा.
24 तासात 4 वेळा सिरपचा कोणताही डोस देऊ नका, जर एक किंवा दोन डोस घेतल्यानंतरही मुलाचे तापमान वाढले असेल, तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. घरी मुलांना 3 पेक्षा जास्त डोस कधीही देऊ नका. कारण या डोसमध्ये आराम जाणवतो. जर ते जाणवले नाही, तर ते एखाद्या विषाणू संसर्गाचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला 500 मिलीग्राम पॅरासिटामॉल कधीही देऊ नका. मुलांना नेहमी सिरप द्या आणि तेही त्यांच्या वयानुसार आणि निर्धारित डोसनुसार. जर तुम्ही 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला 500 मिलीग्राम पॅरासिटामॉल जास्त तापाच्या बाबतीत दिले, तर त्यामुळे नुकसान होऊ शकते.
जर मुलांचे तापमान 99 F पर्यंत असेल तर कोणतीही अडचण नाही. मुलाचे शरीर इतके गरम असणे सामान्य आहे. एवढ्या जास्त तापात घाबरण्याची गरज नाही, जर मुलाला 100 पेक्षा जास्त ताप असेल, तर स्पंजिंग करावे. जर ताप 102 किंवा त्याहून अधिक वाढत असेल, तर पॅरासिटामॉल सिरप द्या.
किमान 10 सेकंद सिरप चांगले हलवा आणि औषधासोबत येणारी प्लास्टिक सिरिंज किंवा चमचा वापरून योग्य प्रमाणात मोजा. तुमच्याकडे सिरिंज किंवा चमचा नसल्यास, तुमच्या फार्मासिस्टकडून एक खरेदी करा. स्वयंपाकघरातील चमचा वापरू नका कारण ते योग्य प्रमाणात मोजले जाणार नाही.
कोणत्याही सिरपचा ओव्हरडोज कधीही घेऊ नका. जर तुम्हाला आराम मिळत नसेल, तर विनाकारण डोस वाढवणे टाळा आणि या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या मुलावर स्वतःहून उपचार करण्याचा कधीही प्रयत्न करू नका.