Sarva Pitru Amavasya : पितृ अमावस्येच्या दिवशी करा हे 3 उपाय, पूर्वजांच्या आशीर्वादाने पूर्ण होतील प्रलंबित कामे!


हिंदू धर्मात सर्व पितृ अमावस्येला सर्वात जास्त महत्त्व आहे, कारण या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. ही तिथी दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला साजरी केली जाते. या दिवशी पिंडदान किंवा तर्पण त्या सर्व पितरांसाठी केले जाते, ज्यांची मृत्यू तारीख माहित नाही किंवा ज्यांचे श्राद्ध काही कारणास्तव पूर्वी केले जाऊ शकले नाही. म्हणून ती सर्व पितरांची अमावस्या म्हणून ओळखली जाते. यंदाची सर्व पितृ अमावस्या विशेष महत्त्वाची आहे, कारण याच दिवशी वर्षातील शेवटचे आणि दुसरे सूर्यग्रहणही होणार आहे. अशा स्थितीत या दिवशी श्राद्ध करणे शुभ ठरेल का?

पितृ पक्षाची समाप्ती सर्व पितृ अमावस्येला होते. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवणे, श्राद्धाची तिथी आणि पिंड दान अर्पण करण्याच्या पद्धतीला अधिक महत्त्व दिले जाते. या दिवशी केलेला कोणताही उपाय प्रभावी मानला जातो. या वेळी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात.

पंचांगानुसार, या वर्षी सर्वपित्री अमावस्या तिथी 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9:40 वाजता आणि 2 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता असेल. या अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. उदय तिथीनुसार अमावस्या तिथी 2 ऑक्टोबरलाच असेल.

पूर्ण होतील अपूर्ण इच्छा
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तिळाचा लाडू बनवून मंदिरात अर्पण करावा. तसेच हे लाडू कावळे, गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला. हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छाही लक्षात ठेवा. असे केल्याने तुमच्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील.

या दिशेकडे द्या विशेष लक्ष
वास्तुशास्त्रानुसार. ईशान्य दिशा पवित्र मानली जाते. हे देवतांचे निवासस्थान मानले जाते. या काळात पितरांची पूजा आणि स्मरण करावे आणि घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी या दिशेने दिवा लावावा. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. घरात पैसा येतो आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होते.

देवी लक्ष्मीसमोर लावा तुपाचा दिवा
सर्वपित्री अमावस्येचा अर्थ म्हणजे पितरांचे स्मरण करणे आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे. या दिवशी पूजा आणि दानाचे फळ आपल्याला मिळते. यावेळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यामुळे आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी 21 वेळा तुळशी माळेचा जप करावा.