
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना गाले स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात श्रीलंकेकडून अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. या सामन्याच्या डावात श्रीलंकेच्या संघाने 5 विकेट गमावून 602 धावा केल्या होत्या आणि डाव घोषित केला. पण याला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडची अवस्था इतकी बिकट झाली की त्यांना फॉलोऑनला सामोरे जावे लागले.
न्यूझीलंडसोबत हे काय झाले, श्रीलंकेने केली वाईट अवस्था, एवढ्याच धावांवर बाद झाला संपूर्ण संघ
गाले कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात अवघ्या 88 धावांवर आटोपला आणि पहिल्या डावाच्या आधारे श्रीलंकेने 514 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे न्यूझीलंडला फॉलोऑन खेळावे लागले. फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्यासमोर न्यूझीलंडचा संपूर्ण संघ फ्लॉप दिसत होता. मात्र ते जास्त वेळ मैदानावर टिकू शकली नाही. या डावातील सर्वात यशस्वी गोलंदाज प्रभात जयसूर्या ठरला. प्रभात जयसूर्याने 18 षटकात 22 धावा देत 6 फलंदाजांना आपले बळी बनवले. जयसूर्याने कारकिर्दीत नवव्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला.
प्रभात जयसूर्याशिवाय निशान पेरीसने तीन आणि असिथा फर्नांडोने एक विकेट घेत संघाला 514 धावांची आघाडी मिळवून दिली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावाच्या आधारे मिळवलेली ही 5वी मोठी आघाडी आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्धची ही दुसरी सर्वात मोठी आघाडी आहे. यापूर्वी 2002 मध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध 570 धावांची आघाडी घेतली होती.
या डावात न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्याचवेळी केवळ 3 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. मिचेल सँटनरने सर्वाधिक 29 धावांची खेळी खेळली. तर डॅरिल मिशेलने 13 धावा केल्या. रचिन रवींद्रलाही केवळ 10 धावा करता आल्या. इतर सर्व खेळाडूंना 10 धावाही गाठता आल्या नाहीत. अशा स्थितीत न्यूझीलंडला आता हा सामना डावाने गमावण्याचा धोका आहे.
