
‘धूम’ फ्रँचायझीच्या शेवटच्या तीन भागात जॉन अब्राहम, ऋतिक रोशन आणि आमिर खान यांनी साकारलेली भूमिका चौथ्या भागात रणबीर कपूर साकारणार आहे. म्हणजेच YRF च्या सर्वात मोठ्या फ्रँचायझीमध्ये तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. रणबीर या चित्रपटाचा भाग होणार असल्याची बातमी येताच त्याचे जुने वक्तव्य व्हायरल होऊ लागले, ज्यात त्याने या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली होती.
‘मला कोणत्याही चित्रपटाची ऑफर आलेली नाही…’ रणबीर कपूरने ‘धूम 4’वर दिली अशी प्रतिक्रिया
2023 मध्ये रणबीर धूममध्ये दिसणार असल्याच्याही चर्चा होत्या. त्यावेळी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्याला याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने सांगितले की, मला या चित्रपटात सहभागी व्हायला आवडेल. ‘धूम 4’ च्या प्रश्नावर तो म्हणाला होता, “खरचं मी आदित्य चोप्रा असतो, तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तर दिले असते. मला ‘धूम 4’ किंवा त्या स्वरूपाच्या कोणत्याही चित्रपटाचा भाग व्हायला आवडेल.
त्यावेळी त्याने असेही म्हटले होते की, मला अद्याप कोणत्याही चित्रपटाची ऑफर आलेली नाही. मात्र, रणबीरने हे सांगून एक वर्ष उलटले आहे. ताजे अपडेट म्हणजे तो या चित्रपटात दिसणार आहे. पिंकविलामधील एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की आदित्य चोप्राने ही फ्रेंचायझी पुढे नेण्याची योजना आखली आहे आणि चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम देखील सुरू झाले आहे.
या चित्रपटात रणबीरसोबत आणखी दोन नवीन कलाकारांचाही प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाची कथा पूर्णपणे फ्रेश असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांच्या पात्रांमध्येही दोन नवे कलाकार दिसणार आहेत.
या वृत्तात असेही सांगण्यात आले की, चित्रपटाची मुख्य कथा निश्चित झाली आहे. 2025 च्या उत्तरार्धात किंवा 2026 च्या सुरुवातीला शूटिंगचे काम सुरू होऊ शकते, असे मानले जात आहे. सध्या हा चित्रपट कास्टिंगच्या टप्प्यात आहे.
