Apple iPhone 16 मालिकेसोबतच कंपनीने त्यांची नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS18 देखील सादर केली आहे. कंपनीने ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम वापरकर्त्यांसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. आयफोन वापरकर्त्यांसाठी iOS 18 मध्ये जोडलेल्या या नवीन वैशिष्ट्याचे नाव आहे व्हॉईस कंट्रोल.
iPhone Features : तुम्ही ट्राय केले आहे का हे नवीन आयफोन फीचर? हात न लावता बोलून होतील सर्व कामे
आयफोन व्हॉईस कंट्रोल फीचर काय आहे आणि हे फीचर तुम्हाला कशी मदत करेल? याबद्दलची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि तुम्हाला हे देखील समजावून सांगणार आहोत की जर तुम्हाला हे फीचर वापरायचे असेल, तर तुम्ही हे फीचर कसे सक्षम करू शकता.
ॲपलच्या अधिकृत साइटवर व्हॉईस कंट्रोल फीचरला व्होकल शॉर्टकट असे नाव देण्यात आले आहे. हे एक उत्तम वैशिष्ट्य आहे, ज्यावर तुम्ही बोलून तुमचे सर्व काम अगदी सहजतेने होईल. या फीचरच्या मदतीने तुम्हाला एखादे ॲप ओपन करायचे असेल, कुणाला मेसेज पाठवायचा असेल किंवा आयफोनवर काहीही सर्च करायचे असेल, या फिचरमुळे सर्व कामे अगदी सहज होतील.
ॲपलच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, आधी सेटिंगमध्ये जा, त्यानंतर ॲक्सेसिबिलिटीमध्ये जा आणि व्हॉईस कंट्रोल ऑप्शनवर क्लिक करा. वैशिष्ट्य चालू केल्यानंतर, कमांडवर क्लिक करा. कमांडवर टॅप केल्यानंतर, नवीन कमांड तयार करा वर टॅप करा. कमांड सेट केल्यानंतर तुमचे काम होईल, त्यानंतर तुम्ही फोनला सेट कमांड देताच आयफोन तुमचे सर्व काम सहज करेल.
कमांड सेट केल्यानंतरही, जर तुम्हाला कमांड हटवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला सेटिंग्ज, त्यानंतर ॲक्सेसिबिलिटी आणि त्यानंतर व्हॉइस कंट्रोल या पर्यायावर जावे लागेल. यानंतर, कमांडवर क्लिक करून शॉर्टकट डिलीट करावा लागेल.