RRB NTPC UG Recruitment 2024 : रेल्वेत लिपिकाच्या 3445 पदांसाठी नोकर भरती सुरू, लवकर करा अर्ज


तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल आणि तीही रेल्वेत, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. रेल्वेत तीन हजारांहून अधिक पदांसाठी भरती सुरू असून, त्यासाठी अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. रेल्वे भरती मंडळाने कालपासून म्हणजेच 21 सप्टेंबरपासून RRB NTPC UG भर्ती २०२४ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. कमर्शियल कम तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि ट्रेन क्लर्क इत्यादी पदांसाठी भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार RRB rrbapply.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर थेट लिंक मिळवू शकतो.

या भरती मोहिमेअंतर्गत रेल्वेमध्ये एकूण 3,445 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे आणि अर्जाची फी 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत भरता येईल.

कोणत्या पदांसाठी किती जागा रिक्त आहेत?

  • कमर्शियल कम तिकीट लिपिक- 2022 पदे
  • खाते लिपिक सह टंकलेखक – 361 पदे
  • कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक- 990 पदे
  • ट्रेन क्लर्क- 72 पदे

कसा करावा अर्ज ?

  • सर्व प्रथम RRB च्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in वर जा.
  • त्यानंतर होम पेजवर उपलब्ध असलेल्या RRB NTPC UG Recruitment 2024 लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे उमेदवारांना खाते तयार करावे लागेल.
  • एकदा हे पूर्ण झाल्यावर लॉगिन करा.
  • अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
  • सबमिट बटणावर क्लिक करा आणि पृष्ठ डाउनलोड करा.
  • भविष्यातील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.

RRB NTPC UG Recruitment 2024 Official Notification

RRB NTPC भरतीसाठी अर्ज शुल्क SC, ST, माजी सैनिक, महिला, PWBD, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच EBC श्रेणीतील उमेदवारांसाठी 250 रुपये आहे, तर इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रुपये 500 आहे. जर उमेदवार संगणक आधारित चाचणी (CBT) मध्ये आले तर त्यांना अर्ज शुल्काचा आंशिक परतावा मिळू शकतो.

संपूर्ण भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी त्यांचा मोबाईल क्रमांक आणि वैध ई-मेल आयडी सक्रिय ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण RRB भरती पूर्ण होईपर्यंत सर्व भरती संबंधित माहिती केवळ एसएमएस आणि ई-मेलद्वारे पाठविली जाईल.

अधिक माहितीसाठी तुम्ही रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट rrbapply.gov.in ला भेट देऊ शकता.