सुप्रीम कोर्टाचे यूट्यूब चॅनल हॅक, उघडल्यावर चालू होतो अमेरिकेचा व्हिडिओ


सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल कोणीतरी हॅक केले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे सर्व व्हिडिओ गायब आहेत. चॅनल उघडल्यावर त्यावर अमेरिकेचा व्हिडीओ चालू होतो. अमेरिकन कंपनी ‘रिपल लॅब्स’ क्रिप्टोकरन्सी एक्सआरपीच्या जाहिरातीचा व्हिडिओ दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे सर्व व्हिडिओ गायब आहेत. व्हिडिओ उघडल्यावर त्यामध्ये काहीच दिसत नव्हते.

व्हिडिओच्या खाली लिहिले होते, ‘ब्रॅड गार्लिंगहाउस: रिपल रेसपोंड्स टू द एसईसी 2 बिलियन डॉलर फाईन! एक्सआरपी प्राइज प्रेडिक्शन’. सर्वोच्च न्यायालय घटनापीठासमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी YouTube चॅनेल वापरते. 2018 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठासमोरील सर्व प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला होता.

अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि नंतर खून प्रकरणाच्या सुनावणीचे थेट प्रसारण केले होते. पण हा व्हिडीओ चॅनलवरून गायब आहे आणि त्याचबरोबर इतर व्हिडीओ देखील गायब आहेत. चॅनल कोणी आणि कुठून हॅक केले याची माहिती सध्या उपलब्ध नाही. दरम्यान या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.