शाहरुख खान आणि सलमान खान बॉलीवूड इंडस्ट्रीवर राज्य करतात, तर विराट कोहली क्रिकेटच्या जगतावर राज्य करतो. नुकतीच देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांची यादी जाहीर करण्यात आली, ज्यामध्ये शाहरुख खानने बाजी मारली होती. सुपरस्टार शाहरुख हा देशातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. पुन्हा एकदा किंग खानने या लढाईत विजय मिळवत विराट कोहलीला या एका बाबतीत मागे टाकले आहे.
1000 कोटींची संपत्ती असलेला कोहली या बाबतीत राहिला शाहरुख-सलमानच्या मागे
वास्तविक, फॉर्च्यून इंडियाने 2023-24 या आर्थिक वर्षाची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये सर्वाधिक कर भरणाऱ्या स्टार्सची नावे समोर आली आहेत. या यादीनुसार, शाहरुख खान सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक कर भरणारा स्टार आहे. 95 कोटींचा कर भरून शाहरुख पहिल्या क्रमांकावर आहे. दुस-या क्रमांकावर साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार थलपथी विजयचे नाव आहे. विजयने 80 कोटी रुपयांचा कर भरला आहे. यात सलमान खानही मागे नाही.
सुपरस्टार सलमान खानचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. फॉर्च्युन इंडियाच्या रिपोर्टनुसार, सलमानने 75 कोटी रुपयांचा कर भरला आहे. सलमाननंतर मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. बिग बींनी 71 कोटींचा कर भरला आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली, ज्याची एकूण संपत्ती 1000 कोटींहून अधिक आहे, तो कर भरण्याच्या बाबतीत शाहरुख-सलमानच्या मागे आहे. पाचव्या क्रमांकावर विराट कोहलीचे नाव आहे.
66 कोटी रुपयांचा कर भरून 35 वर्षीय विराट कोहली 2024 मध्ये सर्वाधिक कर भरणारा खेळाडू बनला आहे. 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात विराट व्यतिरिक्त इतर अनेक मोठ्या खेळाडूंची नावे समाविष्ट आहेत. माजी कर्णधार एमएस धोनी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांची नावेही सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये आहेत. विराटनंतर अजय देवगणचे नाव पुढे आहे. अजयने 42 कोटी रुपयांचा कर भरला आहे.
38 कोटींचा कर भरून माजी कर्णधार एमएस धोनी 7 व्या क्रमांकावर आहे. रणबीर कपूरचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. त्याने 36 कोटी रुपयांचा कर भरला आहे. 28 कोटींचा कर भरून सचिन तेंडुलकर नवव्या क्रमांकावर आहे. हृतिक रोशननेही 28 कोटींचा कर भरला आहे. या यादीत कपिल शर्माच्या नावाचाही समावेश आहे. 26 कोटींचा कर भरणारा तो एकमेव कॉमेडियन आहे. करीना कपूरने 20 कोटी, शाहिद कपूरने 18 कोटी आणि मोहनलालने 18 कोटींचा कर भरला आहे.