इशान किशन टीम इंडियात कधी परतणार हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण भारताला उत्सुकता आहे. इशान किशन पुन्हा निळी किंवा पांढरी जर्सी घालून टीम इंडियाकडून खेळताना दिसणार की नाही. सध्या या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास उशीर लागणार आहे. कारण 5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणारा इशान किशन या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.
इशान किशन दुलीप ट्रॉफीतून बाहेर, टीम इंडियात पुनरागमन आता लांबणीवर, जाणून घ्या काय आहे मोठ कारण?
इशान किशन बाहेर का? तो पहिला सामना खेळू शकत नाही की पुढे खेळणार नाही? अशा प्रश्नांच्या उत्तरांबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. तथापि, क्रिकबझच्या मते, इशान किशन दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडण्याचे कारण दुखापतीशी संबंधित असू शकते.
इशान किशन हा दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत डी संघाचा एक भाग आहे. आता वृत्तानुसार त्याने पहिला सामना खेळला नाही, तर त्याच्या जागी संजू सॅमसनचा या संघात समावेश केला जाऊ शकतो. यापूर्वी जेव्हा दुलीप ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्यात आले होते, तेव्हा संजू सॅमसनला कोणत्याही संघात स्थान मिळाले नव्हते.
दुलीप ट्रॉफीच्या पुढील सामन्यांमध्ये इशान किशन खेळणार की नाही याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही. भारत-बांगलादेश कसोटी मालिकेसाठी त्याची निवड होणार का, हाही प्रश्न आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानंतरच या मालिकेसाठी निवड होणार आहे. पण, इशान किशन पहिल्या सामन्यातून बाहेर असल्याच्या वृत्तानंतर बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड होईल असे वाटत नाही.
आता जर इशान किशनची बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली नाही आणि तो मागे राहिला, तर दुलीप ट्रॉफीच्या पुढील सामन्यांमध्ये तो खेळताना दिसण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम डीला 12 सप्टेंबरपासून दुसरा सामना खेळायचा आहे.
इशान किशन दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळताना दिसणार नाही, पण याआधी खेळल्या गेलेल्या बुची बाबू स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. तेथे त्याने मध्य प्रदेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 86 चेंडूत शतक झळकावले. त्या खेळीतून इशानचा सध्याचा फॉर्म दिसतो, पण तो टीम इंडियात परत येईल की नाही हे सांगता येत नाही.