
आयपीएल 2024 मध्ये दोन नियम चर्चेचा विषय होते. खेळ मनोरंजक बनवण्यासाठी, बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर आणि एकाच षटकात दोन बाऊन्सरला टाकण्याची परवानगी दिली होती. इम्पॅक्ट प्लेअरने अतिरिक्त खेळाडू खेळवण्याचा पर्याय संघाला दिला, तर गोलंदाजांना दोन बाऊन्सरच्या रूपाने मोठे हत्यार मिळाले होते. या नियमाचे सर्वांनी जोरदार स्वागत केले. त्याच वेळी, इम्पॅक्ट प्लेअर नियमावर खेळाचा समतोल बिघडल्याचा आरोप करण्यात आला आणि त्याला लीगमधून काढून टाकण्याची मागणी करण्यात आली. आता भारतीय क्रिकेट बोर्ड या दोन्ही नियमांचा आढावा घेत आहे. हे दोन नियम काढून टाकले, तर त्याचा फटका फलंदाजांवर पडो अथवा न पडो, पण गोलंदाजांच्या हातून एक मोठे हत्यार नक्कीच हिसकावून घेतले जाईल.
आयपीएलमधील हिरावून घेतले जाऊ शकते गोलंदाजांचे हे मोठे हत्यार, बीसीसीआय करत आहे यावर विचार
टी-20 हा फलंदाजांसाठीचा फॉरमॅट आहे, असे मानले जाते. गोलंदाजांकडे स्वतःचे संरक्षण करण्यासाठी फार कमी शस्त्रे असतात. त्यामुळे बोर्डाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोलंदाजांना एकाच षटकात दोन बाऊन्सर टाकण्याची मुभा देण्याचा प्रयोग केला होता, त्याचे क्रिकेटरसिकांनी जोरदार स्वागत केले.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, हा नियम विशेषत: आंतरराज्य देशांतर्गत टी-20 स्पर्धेसाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी आणण्यात आला आहे. तेथे यश मिळाल्यानंतर, आयपीएलमध्येही याची अंमलबजावणी करण्यात आली, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एका बाउन्सरला परवानगी आहे. त्यामुळे बीसीसीआय आता ते हटवण्याच्या विचारात आहे. मात्र, बोर्ड अद्यापही कोंडीत सापडले असून कोणताही निर्णय घेऊ शकलेले नाही.
एकीकडे दोन बाऊन्सरच्या नियमाचे स्वागत होत असतानाच इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमावरून गदारोळ झाला. त्यामुळे एकाच सामन्यात 12 खेळाडू खेळू शकले. त्याचबरोबर गोलंदाजांचीही चांगलीच धुलाई होत होती. त्यामुळेच आयपीएलचा शेवटचा सीझनही हाय स्कोअरिंगचा होता. अनेक क्रिकेट तज्ज्ञ त्यावर टीका करताना दिसले. यामुळे अष्टपैलू खेळाडूंचे नुकसान होत असल्याचे त्यांचे मत होते. काही लोकांनी त्याला पाठिंबाही दिला.
अलीकडेच झहीर खानने इम्पॅक्ट प्लेअरच्या समर्थनार्थ सांगितले की, या नियमामुळे नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. जर कोणी खरा अष्टपैलू असेल, तर त्याला कोणी काढू शकत नाही. एकूणच या नियमावर बराच वाद सुरू आहे. त्यामुळे मंडळ याचाही आढावा घेत आहे.
