
परिश्रम एवढ्या शांतपणे करा की यशाचा आवाज येईल… स्त्री 2 ला मिळालेल्या प्रतिसादानंतर ही ओळ श्रद्धा कपूरला अगदी चपखल बसते. ना फार प्रमोशन ना फार धामधूम, तब्बल 6 वर्षांनंतर ‘स्त्री 2’ मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या श्रद्धा कपूरच्या चित्रपटाच्या यशाची सर्वत्र चर्चा होत आहे. ‘स्त्री 2’ च्या प्रचंड कमाईनंतर, हा केवळ 2024 मधील सर्वात हिट चित्रपटच ठरला नाही, तर श्रद्धाच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट देखील ठरला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. तिसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक सतत थिएटरमध्ये जात आहेत.
Box Office : अक्षय कुमार बसेल डोके धरून ! त्याचे 6 हिट चित्रपटही ‘स्त्री 2’समोर नतमस्तक
श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर ‘स्त्री 2’ ने कमाईच्या बाबतीतही कमाल केली आहे. अक्षय कुमारच्या ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहमच्या ‘वेदा’च्या स्टेटसबद्दल कोणी विचारत नाही. या दोन्ही चित्रपटांनी ‘स्त्री 2’समोर आधीच शरणागती पत्करली आहे. मात्र, यासोबतच चित्रपटाच्या 16व्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. सकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार ‘स्त्री 2’ ने 16व्या दिवशी 7.75 कोटी रुपये कमावले आहेत. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनची ही सर्वात कमी कमाई आहे. पण तरीही या चित्रपटाने अक्षय कुमारच्या मागील 6 हिट आणि सुपरहिट चित्रपटांना मागे टाकले आहे. ‘स्त्री 2’चे भारतात 16 दिवसांचे एकूण कलेक्शन 440.80 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
अक्षय कुमारने गेल्या 10 वर्षात जवळपास 32 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तथापि, या 32 चित्रपटांमध्ये फ्लॉप चित्रपटांची संख्या खूप जास्त आहे. याशिवाय काही हिट आणि काही सुपरहिट चित्रपटांचाही समावेश आहे. पण अक्षय कुमारच्या शेवटच्या 6 सुपरहिट आणि हिट चित्रपटांचे आकडे देखील बघितले तर कमाईच्या बाबतीत या सगळ्यांना ‘स्त्री 2’ ने पराभूत केले आहे. फ्लॉप चित्रपट सोडा, तर अक्षय कुमारचे हिट चित्रपटही श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ला टक्कर देऊ शकत नाहीत.
OMG2 – अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर ‘OMG 2’ प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटाचा पहिला भागही सुपरहिट ठरला होता. हा चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी जवळपास 150 कोटी रुपये खर्च केले होते. तर ‘OMG 2’ ने बॉक्स ऑफिसवर 221.08 कोटी रुपयांची कमाई केली होती. अक्षयचा हा शेवटचा सुपरहिट चित्रपट आहे. तेव्हापासून अक्कीच्या मोठ्या हिट चित्रपटासाठी शोध सुरू आहे.
सूर्यवंशी – रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स चित्रपट ‘सूर्यवंशी’ देखील सुपरहिट ठरला होता. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगण यांचाही खास कॅमिओ होता. हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप आवडला होता. 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 293 कोटी रुपयांची कमाई केली होती. अक्षयच्या चित्रपटाची ही कमाई श्रद्धाच्या ‘स्त्री 2’ पेक्षा खूपच कमी आहे.
गुड न्यूज – बऱ्याच दिवसांनी अक्षय कुमार करीना कपूर खानसोबत ‘गुड न्यूज’मध्ये एकत्र आला होता, तेव्हा या जोडीच्या चित्रपटाने मोठी कमाई केली. अवघ्या 60 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘गुड न्यूज’ने जगभरात 316 कोटींचा व्यवसाय केला. या चित्रपटात अक्षय-करीनाशिवाय दिलजीत दोसांझ आणि कियारा अडवाणी यांच्याही मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला.
हाऊसफुल 4 – अक्षय कुमारचा मल्टीस्टारर ‘हाऊसफुल 4’ बॉक्स ऑफिसवरही हिट ठरला. या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सेनॉन, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रिपोर्टनुसार, हा चित्रपचट बनवण्यासाठी निर्मात्यांनी 175 कोटी रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 296 कोटींची कमाई केली होती.
मिशन मंगल – अक्षय कुमारने त्याच्या गर्ल गँगसोबत ‘मिशन मंगल’ हा ब्लॉकबस्टर बनवला. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एकूण 291 कोटींची कमाई केली होती. अक्षयसोबत ‘मिशन मंगल’मध्ये विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नूसह अनेक स्टार्स उपस्थित होते.
केसरी – 2019 मध्ये अक्षय कुमारने मोठ्या पडद्यावर ‘केसरी’ रिलीज केला. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘केसरी’ने बॉक्स ऑफिसवर 208 कोटींची कमाई केली होती. मात्र, ‘स्त्री 2’समोर अक्षयचे हे सर्व चित्रपट पराभूत झाले आहेत. 50-60 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या ‘स्त्री 2’ने आपल्या कमाईतून सर्वत्र दहशत पसरवली आहे.
