दक्षिण आफ्रिकेने 35 चेंडूत पत्करली शरणागती, एका षटकात 32 धावा करणारा ठरला दुसऱ्या टी-20 सामन्याचा हिरो, वेस्ट इंडिजने केली हॅटट्रिक


T20 खेळ पूर्ण 120 चेंडूंचा असतो. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे होश उडवण्यासाठी केवळ 35 चेंडू पुरेसे होते. या 35 चेंडूंत दक्षिण आफ्रिकेने शरणागती पत्करली. या 35 चेंडूंमध्ये त्यांनी एक, दोन किंवा तीन नव्हे तर 7 विकेट गमावल्या. आता 120 चेंडूंच्या खेळात फक्त 35 चेंडूत 7 विकेट्स घेतल्या, तर तो संघ कसा जिंकणार? याचा परिणाम असा झाला की 25 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा T20 सामना 30 धावांनी जिंकला. यासह त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका जिंकताना हॅटट्रिकही केली. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिजचा हा सलग तिसरा T20 मालिका विजय आहे. सध्याच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला होता. दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वेस्ट इंडिजच्या विजयाचा नायक ठरला तो खेळाडू, ज्याने एका षटकात 32 धावा केल्या.

दुसऱ्या T20I सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 179 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शे होपने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 22 चेंडूत 4 षटकारांच्या मदतीने जलद 41 धावा केल्या. त्याच्याशिवाय कर्णधार रोव्हमन पॉवेलने 22 चेंडूत 3 षटकारांसह 35 धावा केल्या. याशिवाय शरफान रदरफोर्डने 18 चेंडूत 2 षटकारांसह 29 धावांची खेळी केली. अष्टपैलू रोमॅरियो शेफर्ड 6 चेंडूत 9 धावा केल्यानंतर नाबाद राहिला, पण त्याचा खरा खेळ अजून यायचा होता आणि जेव्हा दक्षिण आफ्रिका पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, तेव्हा हे दिसून आले.

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज जोपर्यंत खेळत होते, तोपर्यंत सर्व काही ठीक होत असल्याचे दिसत होते. पहिल्या 4 विकेट पडताच उर्वरित विकेट्स काढण्यास जास्त वेळ लागला नाही, ज्यात जोसेफ आणि शेफर्ड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 13.5 षटकात 4 विकेट गमावत 129 धावा होती. म्हणजेच यावेळेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. त्या 4 विकेटपैकी 2 विकेट शेफर्डने, 1 विकेट हुसेनने आणि 1 विकेट जोसेफने घेतली.

मात्र, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ पुढच्या 35 चेंडूत ऑलआऊट झाला. त्यांनी सामन्यावरील नियंत्रण गमावले. त्या 35 चेंडूत त्यांनी फक्त 20 धावा केल्या आणि 6 विकेट गमावल्या. म्हणजे ते अवघ्या 19.4 षटकांत सर्वबाद झाले. या 6 विकेटपैकी जोसेफ आणि शेफर्ड यांनी मिळून 3 विकेट घेतल्या.

शामर जोसेफने 4 षटकात 31 धावा देत 3 बळी घेतले. तर रोमॅरियो शेफर्ड त्याच्यापेक्षा अधिक किफायतशीर होता. त्याने 4 षटकात केवळ 15 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. चेंडूसह त्याच्या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

रोमारियो शेफर्ड आयपीएल 2024 दरम्यान एका षटकात 32 धावा करत प्रसिद्धीझोतात आला होता. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज एनरिक नॉर्खियाविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याने सामन्याच्या शेवटच्या षटकात 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या होत्या, जे आयपीएल 2024 मधील सर्वात महाग षटक देखील होते.