
‘स्त्री 2’ रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कलेक्शन करेल अशी अपेक्षा होती. मात्र, चित्रपट ज्या गतीने कमाई करत आहे, त्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने धमाका केला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने 2024 सालातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम केला आहे. आता या चित्रपटाच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम झाला आहे.
स्त्री 2 च्या माध्यमातून श्रद्धा कपूरने मोडला तिच्याच चित्रपटाचा हा विक्रम
वास्तविक, तो नवा विक्रम म्हणजे ‘स्त्री 2’ हा श्रद्धाच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी, 2019 मध्ये रिलीज झालेला ‘साहो’ हा श्रद्धाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता, ज्यामध्ये ती प्रभाससोबत दिसली होती. मात्र, ‘स्त्री 2’ ने अवघ्या 10 दिवसांत ‘साहो’ला मागे टाकले आहे.
‘स्त्री 2’ 15 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ आणि जॉन अब्राहमचा ‘वेदा’ही एकाच दिवशी चित्रपटगृहात दाखल झाले, या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर अवस्था वाईट आहे आणि दोन्ही चित्रपट फ्लॉप होण्याच्या मार्गावर आहेत. ‘स्त्री 2’ ने रिलीजच्या अवघ्या 10 दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर 485 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘साहो’ हा ॲक्शन-थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात श्रद्धासोबत बॉलिवूडमधील जॅकी श्रॉफ आणि नील नितीन मुकेशही दिसले होते. प्रभासच्या या चित्रपटाने जगभरातून 451 कोटी रुपयांची कमाई केली होती. 24 ऑगस्टपर्यंत हा श्रद्धाच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट होता. पण आता ‘स्त्री 2’ आहे. तिच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांची यादी तुम्ही खाली पाहू शकता.
श्रद्धाचे टॉप 5 सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट
- साहो- 451 कोटी
- स्त्री 2- 485
- तू छुठी मैं मक्कार – 223 कोटी
- छिछोरे – 211 कोटी
- स्त्री – 182 कोटी
या यादीत तुम्हाला ‘स्त्री’च्या पहिल्या भागाचे नाव देखील समाविष्ट करण्यात आले आहे. पहिला भाग 2018 मध्ये आला होता, त्यालाही लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. 182 कोटींची कमाई करणारा हा चित्रपट बनवण्यासाठी फक्त 30 कोटी रुपये खर्च झाले होते. म्हणजेच बजेटच्या तुलनेत कमाई 6 पट अधिक होती.
मात्र, श्रद्धा ही अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे, जिने केवळ इंडस्ट्रीतच नाही तर चाहत्यांच्या हृदयातही खूप स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर तिची खूप मजबूत फॅन फॉलोईंग आहे. अलीकडे, ती प्रियांका चोप्राला मागे टाकत इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो होणारी दुसरी भारतीय बनली आहे. विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. श्रद्धा कपूरला इंस्टाग्रामवर 92.1 मिलियन म्हणजेच 9.21 कोटी लोक फॉलो करतात. ‘स्त्री 2’च्या कमाईप्रमाणे तिचे फॉलोअर्सही झपाट्याने वाढत आहेत.
मात्र, श्रद्धाच्या सुरुवातीच्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर तिने 2010 मध्ये रिलीज झालेल्या ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. मात्र, या चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळवता आली नाही. त्यानंतर ती ‘लव्ह का द एंड’मध्ये दिसली होती. मात्र, ‘तीन पत्ती’प्रमाणे हा चित्रपटही फ्लॉप झाला. 2013 मध्ये रिलीज झालेला ‘आशिकी 2’ हा श्रद्धाचा पहिला यशस्वी चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. लोकांमध्ये या चित्रपटाची इतकी क्रेझ होती की श्रद्धा लोकांच्या नजरेत आली. येथूनच तिची फॅन फॉलोइंग वाढू लागली आणि आज ती बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री आहे.
