
IPL 2025 पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. कोणता संघ कोणता खेळाडू कायम ठेवणार यासारखे प्रश्न लिलावाकडे लोकांचा उत्साह वाढवत आहेत. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून 5 विजेतेपद पटकावणारा रोहित शर्मा पुढील हंगामात या संघासोबत राहणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गेल्या मोसमात रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यात आले होते. अशा स्थितीत तो आता संघ सोडू शकतो, असे मानले जात आहे. दरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन आयपीएल संघांनी रोहितला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी तयारी केली आहे.
PL 2025 मध्ये रोहित शर्माला मिळतील 50 कोटी रुपये याची खात्री! लिलाव होताच श्रीमंत होणार, या दोन्ही संघांनी कसली कंबर
आयपीएल 2025 पूर्वी, सर्व संघांना फक्त काही खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी असेल. अशा परिस्थितीत रोहित शर्माला सोडण्यात आले, तर तो लिलावात दिसणार आहे. दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की जर रोहित शर्मा लिलावात आला, तर त्याच्यासाठी ऐतिहासिक बोली लावली जाणार आहे. रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्सने रोहितला खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपये ठेवले आहेत. म्हणजेच या दोन्ही संघांना रोहितला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी मोठा खर्च करायचा आहे. मात्र, या बातमीत किती तथ्य आहे हे सांगणे कठीण आहे.
रोहित शर्माने त्याच्या आयपीएल करिअरची सुरुवात डेक्कन चार्जेसमधून केली होती. यानंतर 2011 मध्ये तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. तेव्हापासून तो या संघाकडून खेळत आहे. आयपीएल 2022 पूर्वी मुंबई संघाने रोहितला 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. पण गेल्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईने हार्दिक पांड्याला आपल्या संघात समाविष्ट करून कर्णधार बनवले होते. यानंतर मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांच्यात काही ठीक नसल्याच्या बातम्या आल्या.
मुंबई इंडियन्सने 2013 मध्ये रोहितला कर्णधार बनवले होते. कर्णधार म्हणून पहिल्याच सत्रात मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यात यश मिळवले होते. यानंतर त्याने मुंबई संघाला 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये IPL चा चॅम्पियन बनवले. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. मात्र यानंतर काही हंगाम त्याच्या संघासाठी खराब गेले आणि त्यानंतर शेवटच्या मोसमात त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले.
