टाळी आणि शिट्टी वाजवून शोधू शकणार स्मार्टफोन, जाणून घ्या कशी काम करेल ही पद्धत


असे काही लोक आहेत, जे आपला स्मार्टफोन सतत कवटाळून ठेवतात आणि काही लोक असे असतात ज्यांना त्यांच्या स्मार्टफोनची पर्वा नसते. जेव्हा त्यांना कॉल करायचा असतो किंवा कोणाचा कॉल उचलायचा असतो, तेव्हाच हे लोक आपला स्मार्टफोन उचलतात.

अनेकवेळा अशा लोकांच्या निष्काळजीपणामुळे ते कार्यालयात आणि घरी स्मार्टफोन कुठे तरी ठेवून विसरुन जातात. यावेळी स्मार्टफोन सायलेंट मोडवर असेल, तर तो सापडणे कोणालाही शक्य होत नाही. कारण यावेळी स्मार्टफोनवर कॉल करतानाही सायलेंट मोडमुळे बेल वाजत नाही.

अनेक वेळा आपण आपला फोन कुठे तरी ठेवून विसरतो. अशा परिस्थितीत फोन शोधण्यात अनेकदा अडचणी येतात. आपला फोन सायलेंट झाला की समस्या वाढतात आता ही समस्या सोडवण्यासाठी काही ॲप्स आले आहेत. या ॲप्सच्या मदतीने तुम्ही फक्त शिट्टी आणि टाळी वाजवून तुमचा फोन शोधू शकता.

असेच एक ॲप म्हणजे Find My Phone Clap, Whistle. हे ॲप प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येते. जेव्हा वापरकर्ता टाळी किंवा शिट्टी वाजवतो, तेव्हा वापरकर्त्याच्या फोनचा फ्लॅश लाइट चालू होतो. हे तुम्हाला तुमचा फोन अंधारात शोधण्यात मदत करेल. जेव्हा तुम्ही टाळी किंवा शिट्टी वाजवता, तेव्हा फोनची रिंग देखील वाजते. वापरकर्ते त्यांच्या आवडीची कोणतीही रिंगटोन सेट करू शकतात. यामध्ये तुम्हाला 12 वेगवेगळ्या प्रकारचे टोन सेट करण्याचा पर्याय देखील मिळेल.

यासाठी वापरकर्त्यांना फक्त एक छोटासा सेटअप करणे आवश्यक आहे. याशिवाय, काही ॲप्स आहेत, ज्यामध्ये फक्त शिट्टी वाजवणे किंवा टाळी वाजवणे आवश्यक आहे. क्लॅप टू फाइंड आणि व्हिसल फोन फाइंडर प्रमाणे, क्लॅप टू फाइंड फोन सायलेंट मोडमध्येही वाजण्यास मदत करते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ॲप इंटरनेटशिवाय काम करते. तर Whistle Phone Finder मध्ये, जेव्हा तुम्ही शिट्टी वाजवता, तेव्हा फोनमधून आवाज येतो. याव्यतिरिक्त, फोनचा कॅमेरा आणि लाईट देखील पेटतो. त्याच्या मदतीने तुम्ही अंधारातही तुमचा फोन सहज शोधू शकता. हे दोन्ही ॲप्स अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीसाठी उपलब्ध आहेत.