तुमची आरोग्य तपासणी घरीच करून घ्यायची आहे, पण कोणते मोबाइल ॲप वापरायचे हे माहित नाही? घरबसल्या रक्ताचे नमुने गोळा करण्याची सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. पण मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
Health Checkup Apps : घरबसल्या करता येईल रक्त तपासणी, हे ऑनलाइन ॲप्स करतील तुम्हाला मदत
स्मार्टफोनमध्ये कोणतेही ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी किंवा ॲप वापरण्यापूर्वी, इतर लोकांना ॲपचा कसा अनुभव आहे, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. अन्यथा, तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा तीन ॲप्सबद्दल सांगणार आहोत ज्यांना लोकांनी Google Play Store आणि Apple App Store वर चांगले रेटिंग दिले आहे.
Dr. Lal PathLabs
या मोबाइल ॲपला गुगल प्ले स्टोअरवर 5 पैकी 4.3 रेटिंग मिळाले असून हे ॲप 50 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. या ॲपद्वारे तुम्ही फुल बॉडी चेकअपसाठी टेस्ट बुक करू शकता, टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला ॲपवरच रिपोर्ट मिळेल. ॲपल ॲप स्टोअरवर या ॲपला 3.4 रेटिंग मिळाले आहे.
Healthians Full Body Checkup
या मोबाइल ॲपला गुगल प्ले स्टोअरवर 5 पैकी 4.5 रेटिंग मिळाले आहे, हे ॲप 10 लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. या ॲपद्वारे चाचण्या बुक करण्याव्यतिरिक्त तुम्ही घरी बसून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला हे ॲप Apple ॲप स्टोअर (4.6 रेटिंग) वर देखील मिळेल.
Orange Health Lab Test At Home
या मोबाइल ॲपला गुगल प्ले स्टोअरवर 5 पैकी 4.7 रेटिंग मिळाले आहे, या ॲपद्वारे चाचणी बुक केल्यानंतर आणि चाचणी झाल्यानंतर अहवाल ॲपवरच उपलब्ध होईल. तुम्हाला हे ॲप Apple ॲप स्टोअर (4.8 रेटिंग) वर देखील मिळेल.
लक्षात असू द्या
वर नमूद केलेले कोणतेही ॲप वापरण्यापूर्वी, Google Play Store किंवा Apple App Store वरील लोकांची पुनरावलोकने वाचा. ही माहिती गुगल प्ले स्टोअरवर ॲप्सना मिळालेल्या चांगल्या रेटिंगवर आधारित आहे.