
इंग्लंडच्या 100 चेंडूंच्या क्रिकेट लीग ‘द हंड्रेड’मध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. 29 जुलै रोजी झालेल्या साखळी सामन्यात एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले. एकाच दिवसात दोन वेळा एक धावेवरुन गदारोळ झाला. प्रथम जिंकलेल्या संघाचाही पराभव झाला आणि यातून एक विलक्षण इतिहास रचला गेला. वास्तविक, ‘द हंड्रेड’मध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एखादा संघ सामना 1 धावाने हरला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे एकाच दिवसात दोनदा दिसले आहे.
एकाच दिवसात दोनदा झाला 1 रनचा गदारोळ, द हंड्रेडमध्ये दिसले ऐतिहासिक दृश्य, जिंकणारा संघही हरला!
29 जुलै रोजी ‘द हंड्रेड’मध्ये दोन सामने खेळले गेले. या दोन्ही सामन्यात खेळणारे संघ सारखेच होते. मँचेस्टर ओरिजिनल्स आणि ट्रेंट रॉकेट्स. फरक एवढाच होता की या दोन संघांमध्ये झालेल्या दोन सामन्यांमध्ये पहिला सामना महिलांचा आणि दुसरा पुरुषांचा होता. महिला गटात मँचेस्टर ओरिजिनल्सने, तर पुरुष गटात ट्रेंट रॉकेट्सने बाजी मारली. म्हणजे महिला गटात जिंकलेला संघ पुरुष गटात पराभूत झाला आणि, दोन्ही सामन्यातील विजय आणि पराभवातील फरक फक्त 1 धावांचा होता.
प्रथम मँचेस्टर ओरिजिनल्स आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात महिलांचा सामना झाला. मँचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात मँचेस्टर ओरिजिनल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूत 6 गडी गमावून 137 धावा केल्या. प्रत्युत्तरात 138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रेंट रॉकेट्स संघाला 100 चेंडूत 4 गडी गमावून केवळ 136 धावा करता आल्या.
द हंड्रेड आणि ट्रेंट रॉकेट्सच्या महिलांच्या स्पर्धेतील 2 सामन्यांमधला मँचेस्टर ओरिजिनल्सचा हा पहिलाच विजय आहे.
दोन्ही संघांचा पुरुष सामनाही मँचेस्टरमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये ट्रेंट रॉकेट्सने मँचेस्टर ओरिजिनल्सचा 1 धावेने पराभव केला. यामध्ये ट्रेंट रॉकेट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 100 चेंडूत 7 गडी गमावून 145 धावा केल्या. प्रत्युत्तरात 146 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मँचेस्टर ओरिजिनल्सचा पुरुष संघ 100 चेंडूत 8 गडी गमावून केवळ 144 धावाच करू शकला. मँचेस्टर ओरिजिनल्सचा 2 सामन्यांमधील दुसरा पराभव.
