NEET UG 2024 काऊसिलिंग वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नॅशनल मेडिकल कौन्सिल कमिशनने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, 14 ऑगस्टपासून काऊसिलिंग प्रक्रिया सुरू होईल आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. NEET UG 2024 परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार MCCच्या mcc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात. NEET UG मध्ये SC, ST आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना किती आरक्षण मिळते, ते आम्ही तुम्हाला सांगतो.
OBC, SC, ST आणि EWS ला NEET मध्ये मिळते किती आरक्षण? कसे केले जाईल काऊसिलिंग ते जाणून घ्या
नोटीसनुसार, नोंदणी/पेमेंट 14 ते 21 ऑगस्ट दरम्यान दुपारपर्यंत केले जाईल. चॉईस फिलिंग/लॉकिंग 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान होईल. 21 ते 22 ऑगस्ट रोजी जागा वाटपाची प्रक्रिया होणार असून 23 ऑगस्ट रोजी जागा वाटपाचा निकाल जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत कॉलेज वाटप केले जाईल.
त्यांना 24 ते 29 ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या महाविद्यालयात कळवावे लागतील. नोंदणीसाठी, विद्यार्थ्यांना NEET UG स्कोअरकार्ड, 10वी आणि 12वीची गुणपत्रिका, श्रेणी प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी अनेक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
ओबीसी, एससी आणि एसटीसाठी आहे किती आरक्षण?
- SC- 15 टक्के
- ST- 7.5 टक्के
- ओबीसी (नॉन-क्रिमी लेयर) – 27 टक्के
- EWS- 10 टक्के
- PWD- 5 टक्के
किती जागांवर होणार काऊसिलिंग?
NEET UG काऊसिलिंग 2024 वैद्यकीय काऊसिलिंग समितीद्वारे MBBS, BDS आणि B.Sc नर्सिंग जागांसाठी अखिल भारतीय कोट्यातील 15 टक्के जागांसाठी आयोजित केले जाईल. 85 टक्के राज्य कोट्यातील जागांसाठी राज्य वैद्यकीय समुपदेशन प्राधिकरणाद्वारे समुपदेशन केले जाईल.
एमबीबीएसच्या किती जागा, किती कॉलेजेस?
देशात एकूण 704 वैद्यकीय महाविद्यालये आहेत, त्यापैकी 379 सरकारी आणि 315 खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या एकूण 55,648 जागा आणि खासगी महाविद्यालयात एमबीबीएसच्या 50,685 जागा आहेत. एमबीबीएसच्या सर्व जागा NEET UG काऊसिलिंगद्वारे भरल्या जातील.
NEET UG मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुण आणि रँकच्या आधारावर सरकारी आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये जागा वाटप केल्या जातील. या संदर्भात अधिक माहितीसाठी, तुम्ही MCC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.