
दीपिका पादुकोण सध्या निर्मात्यांपासून चाहत्यांची पहिली पसंती आहे. आजवर हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणत्याही अभिनेत्रीने केलेला नाही, असा पराक्रम तिने केला आहे. अभिनेत्रीच्या 3-3 चित्रपटांनी 1000-1000 कोटींची कमाई केली आहे. हा विक्रम सर्वच अभिनेत्रींसाठी मोठे आव्हान बनले आहे. दीपिकाचा कल्की 2898 एडी 27 जून रोजी थिएटरमध्ये आला. या चित्रपटाने 1100 कोटींहून अधिक कमाई केली असून हा ट्रेंड सुरूच आहे. दरम्यान, दीपिकाने हॉलिवूडचा एक मोठा प्रोजेक्ट नाकारला आहे.
एकीकडे कल्कीने कमावले 1000 कोटी, तर दुसरीकडे दीपिका पादुकोणने नाकारला हॉलिवूडचा हा मोठा प्रोजेक्ट
दीपिका पादुकोण तिच्या आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. दीपिका लवकरच आई होणार आहे. रणवीर सिंगही त्याच्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहे. या अभिनेत्रीने तिच्या गर्भधारणेच्या कालावधीला प्राधान्य देत मोठ्या मालिकांना नकार दिला आहे. एका रिपोर्टनुसार, ‘द व्हाईट लोटस एस3’साठी दीपिकाशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र अभिनेत्रीने तो करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
दीपिका-रणवीरच्या जवळच्या व्यक्तीने टाईम्स नाऊला सांगितले की, या क्षणी अभिनेत्रीला तिच्या गर्भधारणेच्या टप्प्याचा पूर्ण आनंद घ्यायचा आहे. हे जोडपे आपल्या मुलाच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. दीपिकाला तिचे संपूर्ण लक्ष आपल्या मुलावर ठेवायचे आहे. दीपिकाने सध्या कोणताही नवीन चित्रपट साईन न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. आता ती आई झाल्यानंतरच नवीन प्रोजेक्ट साईन करण्याचा विचार करणार आहे. रणवीर सिंगही त्याची पत्नी दीपिकाला ट्रोलिंगपासून वाचवताना दिसत आहे.
दीपिकाचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. लवकरच ती रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये एक खास कॅमिओ करताना दिसणार आहे. या चित्रपटात तिची भूमिका खास तयार करण्यात आली आहे. युनिफॉर्ममध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. याशिवाय तिच्या हातात अनेक मोठे चित्रपट आहेत. दीपिकाने सध्या चित्रपटांच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे. आता ती आई झाल्यानंतरच तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
