
तुम्ही रस्त्यावर, डोंगरावर आणि अगदी वाळवंटातही गाडी धावताना पाहिली असेल, पण तुम्ही कधी कल्पना केली आहे का की एखादी कार पाण्यात माशासारखी पोहू शकते? तुम्ही देखील विचार करत असाल की कार पाण्यात कशी तरंगू शकते, आश्चर्यचकित होऊ नका, हे नक्कीच होऊ शकते. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनी बिल्ड युवर ड्रीम्स म्हणजेच BYD कडे अशीच एक उत्तम इलेक्ट्रिक कार आहे.
BYD Yangwang U8 : माशाप्रमाणे पाण्यात पोहू शकते ही कार! एका चार्जवर धावते 1000 किमी
BYD ची ही इलेक्ट्रिक SUV कंपनीच्या प्रीमियम ब्रँड YangWang अंतर्गत येते. यांगवांग U8 असे या कारचे नाव आहे. या एसयूव्हीला इतरांपेक्षा वेगळे बनवणारे वैशिष्ट्य म्हणजे ही कार एक उत्तम ऑफ-रोडिंग अनुभव देते आणि ही कार पाण्यातही पोहू शकते.
या कारमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत, कंपनीचा दावा आहे की ही कार पाण्यात 1 मीटर ते 1.4 मीटर पाण्यात न बुडता पोहू शकते. कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या बाजूला कॅमेरे दिले आहेत, जे कारमधील डिस्प्लेवर प्रत्येक क्षणाचे अपडेट दाखवतात. या कारमध्ये प्लग-इन हायब्रिड सिस्टीम आहे, ज्यामध्ये चार इलेक्ट्रिक मोटर्स देखील आहेत.
या कारमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असून 75 लीटरची इंधन टाकी देखील या वाहनात उपलब्ध आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक SUV मध्ये 49kWh ची बॅटरी दिली आहे, कंपनीचा दावा आहे की ही SUV फुल चार्ज केल्यावर 1000 किलोमीटर पर्यंत धावू शकते.
या एसयूव्हीला 30 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 18 मिनिटे लागतात. पाणी आत येऊ नये म्हणून या वाहनाचे सर्व दरवाजे आणि एक्झिट पॉइंट सीलबंद केले आहेत. ही कार पाण्याच्या पृष्ठभागावर 30 मिनिटे आणि सुमारे 3 किलोमीटर आरामात तरंगू शकते. कंपनीने पुरासारख्या आपत्कालीन परिस्थितीला लक्षात घेऊन हे फिचर तयार केले आहे.
या इलेक्ट्रिक वाहनाची किंमत 1.5 लाख डॉलर (सुमारे 1 कोटी 26 लाख रुपये) आहे. ही कार भारतीय बाजारपेठेत लॉन्च होईल की नाही ? याबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही.
