
कार चोरीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत चोरांच्या वाईट नजरेपासून कारचे संरक्षण करता यावे, यासाठी आपण नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. कार चोरण्यासाठी चोर देखील नवनवीन युक्ती अवलंबत असतात, जर तुम्हाला तुमच्या कारच्या दाराच्या हँडलमध्ये एखादे नाणे अडकलेले दिसले, तर तुम्ही समजून जा की चोरांनी हा सापळा तुमच्या कार चोरण्यासाठी लावला आहे.
Car Theft : गाडीच्या दाराच्या हँडलमध्ये दिसले नाणे, तर लगेच करा हे काम, अन्यथा चोरीला जाईल कार
चोरांच्या या सापळ्यातून वाहन वाचवण्यासाठी काय करण्याची गरज आहे? सर्वप्रथम, कारच्या दरवाजाच्या हँडलमध्ये अडकलेले नाणे काढून टाका आणि फेकून द्या. नाण्याने तुमची कार कशी चोरली जाऊ शकते? ते आम्ही तुम्हाला सांगतो.
कारच्या दाराच्या हँडलवर दिसणारे नाणे तुम्ही फेकले नाही, तर तुमचे लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. आता तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होत असेल की एका नाण्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान कसे होऊ शकते?
वाहनामध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टीम देण्यात आली आहे, म्हणजेच वाहनाच्या किल्लीचे एक बटण दाबल्याने वाहनाचे सर्व दरवाजे बंद होतात. तुम्ही तुमची गाडी पार्क करून कुठेतरी जाता, तेव्हा मागून चोर येतात आणि तुमच्या कारच्या दारात नाणे टाकतात, त्यानंतर तुम्ही परत आल्यावर तुमच्या गाडीचे कुलूप चावीने उघडता आणि निघून जाता, नंतर चोरटे तुमचा पाठलाग करतात.
यानंतर, जेव्हा तुम्ही तुमची कार पुन्हा पार्क करता आणि चावीने कारचे दरवाजे लॉक करता तेव्हा तुम्हाला वाटते की दरवाजे लॉक झाले आहेत, ते तुम्ही तपासात नाही, परंतु तुमची ही चूक तुमचे नुकसान करू शकते. वास्तविक, यावेळी नाण्यामुळे दारांना कुलूप लागत नाही आणि तुम्ही तेथून बाहेर पडताच चोरटे तुमची कार चोरून घेऊन जातात.
