
प्रसिद्ध कवी आणि अभिनेता शैलेश लोढा याचा आज 55 वा वाढदिवस आहे. शैलेश लोढाने सोनी, सब टीव्हीची प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. शीर्षक भूमिकेसोबतच त्याला या मालिकेचा निवेदकही बनवण्यात आले होते. जवळपास 14 वर्षे या शोमध्ये काम केल्यानंतर, असित मोदीने प्रॉडक्शन हाऊससोबतच्या मतभेदांमुळे हा प्रसिद्ध टीव्ही शो सोडण्याचा निर्णय घेतला. अल्लू अर्जुनच्या पुष्पाप्रमाणे शैलेश लोढा हा प्रॉडक्शन हाऊसपुढे झुकला नाही, उलट तारक मेहतासारख्या बड्या प्रॉडक्शन हाऊसला त्याच्यापुढे झुकायला भाग पाडले.
Birthday Special : असा अभिनेता ज्याच्यापुढे तारक मेहताच्या प्रोडक्शन हाऊसलाही व्हावे लागले नतमस्तक
खरं तर, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सोडल्यानंतरही शैलेश लोढाला त्याची थकबाकी देण्यात आली नव्हती. जवळपास वर्षभर तो प्रॉडक्शनला त्याचे थकीत पैसे मिळण्याची वाट पाहत होता. पण प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही प्रॉडक्शनकडून पैसे न मिळाल्याने शैलेश लोढाने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) मध्ये असित मोदी आणि त्यांची प्रोडक्शन कंपनी ‘नीला टेलिफिल्म्स’ विरोधात केस दाखल केली. या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने शैलेश लोढा याच्या बाजूने निर्णय दिला आणि ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मित्याला त्याला थकबाकी देण्याचे आदेश दिले आणि शेवटी असित मोदीच्या प्रॉडक्शनने शैलेश लोढाला 1 कोटी 5 लाख 85 हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्टने त्याचे थकीत पैसे देण्यात आले.
विजयानंतर शैलेश लोढाने ETimes टीव्हीशी केलेल्या खास संवादात सांगितले होते की, त्याचा लढा पैशासाठी नाही, तर न्याय आणि स्वाभिमानासाठी होता आणि हा खटला जिंकल्यानंतर त्याला असे वाटते की त्याने काहीतरी मोठे यश मिळवले आहे. शैलेश पुढे म्हणाला की, या विजयामुळे मी खूप आनंदी आहे की अखेर हे सत्य सर्वांसमोर आले आहे. वास्तविक, त्यांना (निर्मात्यांना) मी थकबाकी भरण्यापूर्वी काही कागदपत्रांवर सही करावी असे वाटत होते, या कागदपत्रांमध्ये अनेक अटी होत्या. यापैकी एक अट होती की मी मीडियाशी बोलणार नाही. पण मी त्यांच्यापुढे झुकलो नाही. माझे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी मी कोणत्याही कागदावर सही का करावी?
वास्तविक शैलेश लोढा यांना तारक मेहता का उल्टा चष्मा करताना कॉमेडी शो ऑफर करण्यात आला होता. त्याने ‘तारक मेहता…’ सोबत शेमारूचा कॉमेडी शो करावा अशी त्याची इच्छा होती. पण प्रोडक्शन हाऊसने त्याला दुसरा शो करण्याची परवानगी दिली नाही. प्रॉडक्शनची ही गोष्ट शैलेश लोढाला आवडली नाही आणि त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला.
