
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारसाठी मागील काही काळ फारसा चांगला गेला नाही. एकीकडे सनी देओल-शाहरुख खानचे चित्रपट 500 कोटींची कमाई करत असताना दुसरीकडे अक्षय कुमारचे चित्रपट 100 कोटींची कमाई करण्यासाठीही धडपडताना दिसत आहे. चित्रपटाच्या कमाईचे ताजे आकडे आले असून आठवड्याच्या शेवटी चित्रपटाच्या कमाईत सुधारणा झाली आहे.
वीकेंडला सरफिराने पकडला वेग, अक्षय कुमारला मिळाले चांगल्या अभिनयाचे गिफ्ट
अक्षय कुमार दरवर्षी 4-5 चित्रपट करतो. यावेळीही तो असेच करताना दिसला आहे. पण फरक हा आहे की आता त्याचे चित्रपट पूर्वीसारखे चालत नाहीत. अभिनेत्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली आहे आणि चाहतेही त्याच्या चित्रपटांमध्ये फारसा रस दाखवत नाहीत. त्याचा थेट परिणाम त्याच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील आकडेवारीवरून दिसून येतो. चित्रपटाची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्या दिवशी चित्रपट फक्त अडीच कोटींची कमाई करू शकला. पण पहिल्या वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे.
शनिवारी या चित्रपटाने 4.25 कोटींची कमाई केली होती आणि रविवारी चित्रपटाने पुन्हा वेग पकडला आणि 5.1 कोटी रुपयांची कमाई केली. तीन दिवसांत चित्रपटाची एकूण कमाई 11.85 कोटींवर पोहोचली आहे. चित्रपटाचे बजेट जवळपास 85 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाची पहिल्या वीकेंडची कमाई फारशी झालेली नाही. या चित्रपटाला अजूनही झपाट्याने कलेक्शन वाढवावे लागणार आहे. विशेषत: पहिला आठवडा चित्रपटासाठी खूप महत्त्वाचा असेल. या चित्रपटासह रिलीज झालेला कमल हसनचा इंडियन 2 काही विशेष करत नाहीये. याचा फायदा अक्षयच्या चित्रपटाला होऊ शकतो.
