महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकारी पूजा खेडकरची नोकरी धोक्यात आली आहे. तिला बडतर्फ केले जाऊ शकते. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा हिच्यावर फसवणूक करून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. याशिवाय तिच्यावर तथ्य लपविण्याचे आणि चुकीची माहिती दिल्याचेही आरोप आहेत. हे सर्व आरोप खरे ठरले, तर तिच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते.
नखरेलपणा बनली समस्या! IAS पूजा खेडकरची नोकरी धोक्यात, होऊ शकते बडतर्फ
केंद्र सरकारने पूजेशी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. डीओपीटीचे अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांनी तपास सुरू केला आहे. दोन आठवड्यात तपास पूर्ण होईल. ती दोषी आढळल्यास तिला बडतर्फ केले जाऊ शकते. तिला तिची नोकरीही गमवावी लागू शकते. पदाचा गैरवापर केल्यामुळे पूजाची नुकतीच पुण्याहून वाशीमला बदली झाली.
आयएएस पूजाला प्रोबेशन दरम्यान खूप त्रास झाला होता. पूजाने तिच्या खासगी ऑडी कारमध्ये निळे आणि लाल दिवे लावल्याने वाद निर्माण झाला होता. तिच्या प्रोबेशनच्या काळात तिने तिच्या ऑडीवर महाराष्ट्र सरकार लिहून घेतले. रुजू झाल्यानंतर पूजाने आपल्या पदाचा गैरवापर करून विविध मागण्या करण्यास सुरुवात केली.
पूजा पुण्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रोबेशनवर होती. यावेळी ती अशा गोष्टींची मागणी करत होती, जी तिला प्रोबेशनमध्ये मिळत नव्हती. यानंतर तिची पुण्याहून वाशीम येथे बदली झाली.
नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला एक अहवाल सादर केला आहे, ज्यामध्ये आयएएस प्रोबेशनरी ऑफिसर पूजा खेडकरने स्टील चोरी प्रकरणात अटक केलेल्या तिच्या नातेवाईकाची सुटका करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव आणल्याचे नमूद केले आहे. तिने मे महिन्यात नवी मुंबई पोलिसांच्या डीसीपींना फोन केला होता. नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी हा अहवाल पाठवला आहे.