
‘कल्की 2898 एडी’ रिलीज होऊन आठ दिवस उलटले आहेत आणि प्रत्येक दिवसागणिक हा चित्रपट नवा इतिहास रचताना दिसत आहे. प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला जगभरातून भरभरून प्रेम मिळत आहे. मात्र, या चित्रपटाचा खरा हिरो अमिताभ बच्चन मानला जात आहे. अमिताभ यांनी वयाच्या 81 व्या वर्षी ‘कल्की 2898 एडी’मध्ये दाखवलेल्या करिष्म्याचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहेत. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट सर्वांनाच मागे टाकत असल्याचे दिसत आहे.
Box Office Collection : थांबणार नाही ‘कल्की 2898 एडी’चे वादळ, आठव्या दिवशीही रेकॉर्डब्रेक कमाई सुरूच
‘कल्की 2898 एडी’ बॉक्स ऑफिसवरही कमाई करत आहे. अशा परिस्थितीत प्रभासच्या चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. तेलुगु व्हर्जनमध्ये हा चित्रपट प्रचंड कमाई करेल अशी अपेक्षा होती. पण आकडे बघितल्यावर हिंदी आवृत्ती तेलगू आवृत्तीवर भारी पडत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सकनिल्कच्या ताज्या अहवालानुसार, ‘कल्की 2898 एडी’ ने रिलीजच्या आठव्या दिवशी 22.3 कोटी रुपये कमावले आहेत.
सर्व भाषांमध्ये आठव्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाल्यास, ‘कल्की 2898 एडी’ ने तेलुगुमध्ये 10 कोटी रुपये, कन्नडमध्ये 0.2 कोटी रुपये, हिंदीमध्ये 10.5 कोटी रुपये, तमिळमध्ये 0.9 कोटी रुपये आणि मल्याळममध्ये 0.7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आकडेवारीनुसार, या चित्रपटाने हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई केली असून, प्रभास, दीपिका आणि अमिताभ यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचे आतापर्यंत भारतात एकूण कलेक्शन 414.75 कोटी रुपये झाले आहे. या आठवड्याच्या अखेरीस ‘कल्की 2898 एडी’ भारतात सहजपणे 500 कोटी रुपयांची कमाई करेल.
रणबीर कपूरच्या ॲनिमलने जगभरात 900 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. आता ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाला पराभूत करताना दिसत आहे. प्रभासच्या चित्रपटाने जगभरात 700 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच तो ॲनिमलचे जगभरातील कलेक्शनही मोडणार आहे. ‘कल्की 2898 एडी’मुळे जवान-पठाणचा 1000-1000 कोटींचा विक्रमही धोक्यात आला आहे. हा चित्रपट ज्या वेगाने कमाई करत आहे, त्या वेगाने तो लवकरच 1000 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
