
संपूर्ण भारत सध्या टीम इंडियासोबत T20 वर्ल्ड कप 2024 च्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. वेस्ट इंडिजमध्ये 2024 चा विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ आज सकाळी दिल्लीत पोहोचला. टीम इंडियाचे दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर टीम इंडिया दिल्लीतील मौर्या हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी पंतप्रधान मोदींच्या ७, लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी सुमारे दोन तास घालवले. यादरम्यान खेळाडूंनी पीएम मोदींसोबत फोटोशूटही केले. टीम फोटोदरम्यान पंतप्रधान मोदी कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत उभे असल्याचे दिसले. पण पीएम मोदींनी टी-20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीला हात लावला नाही. पीएम मोदींनी असे का केले, त्यामागे एक खास कारण आहे. वास्तविक, विश्वचषक ट्रॉफी फक्त चॅम्पियन्सकडेच असते, असा समज आहे. देशाच्या पंतप्रधानांना विश्वचषकाच्या ट्रॉफीला हात लावण्याचा अधिकार असला, तरी पंतप्रधान मोदींनी खेळाडूंच्या सन्मानार्थ ट्रॉफीला हात लावला नाही. या पावलावर पंतप्रधान मोदींचे खूप कौतुक होत आहे. दुसरीकडे, 1983 च्या विश्वचषकानंतर काढलेला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीम इंडिया आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर का व्हायरल झाला इंदिरा गांधींचा 1983 च्या वर्ल्ड कपचा फोटो ?
A memorable occasion as #TeamIndia got the opportunity to meet the Honourable Prime Minister of India, Shri Narendra Modiji in Delhi 🙌@narendramodi | @JayShah pic.twitter.com/eqJ7iv9yVw
— BCCI (@BCCI) July 4, 2024
टीम इंडियाने 1983 मध्ये पहिला ICC विश्वचषक जिंकला होता. अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताने संपूर्ण जगाला चकित करणारी कामगिरी केली होती. वास्तविक, त्यावेळी वेस्ट इंडिज हा सर्वात बलाढ्य संघ होता आणि भारताने त्यांना हरवून विजेतेपद पटकावले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतीय खेळाडूंचे भारतात जंगी स्वागत केले होते. त्यानंतर इंदिरा गांधींनीही विश्वचषक विजेत्या संघासोबत फोटोशूट करून घेतले आणि त्या वर्ल्ड कप ट्रॉफी हातात घेऊन उभ्या राहिल्या.
2007 मध्ये, एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इतिहास रचला होता आणि पहिला T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर टीम इंडियाचे भारतात भव्य स्वागत करण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संघातील खेळाडूंची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदनही केले होते. त्याचवेळी जेव्हा टीम इंडियाने 2011 चा वर्ल्ड कप मायदेशात जिंकला, तेव्हा देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील होत्या आणि त्यांनी संघातील खेळाडूंची भेट घेतली आणि फोटोही काढले होते.
