
टीम इंडियाला 6 जुलैपासून झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला रवाना झाला आहे. पण काही खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये आहेत, जे T20 विश्वचषक खेळण्यासाठी गेले होते. मात्र खराब हवामानामुळे हे खेळाडू झिम्बाब्वेला वेळेवर पोहोचू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघात बदल केले आहेत.
झिम्बाब्वे मालिकेसाठी टीम इंडियात बदल, या 3 खेळाडूंचा संघात समावेश, जाणून घ्या कोणाची जागा घेणार
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. हे खेळाडू संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांची जागा घेतील. वास्तविक, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल हे बार्बाडोसहून थेट भारतात येतील आणि नंतर ते झिम्बाब्वेला जातील.
साई सुदर्शन आणि जितेश शर्मा यापूर्वी भारतीय संघात होते. त्याचबरोबर हर्षित राणाचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. हर्षित राणाने आयपीएल 2024 मध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने 12 सामन्यात 19 विकेट घेतल्या आणि कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. आता या कामगिरीचे फळ त्याला मिळाले आहे.
🚨 NEWS 🚨
Sai Sudharsan, Jitesh Sharma and Harshit Rana added to India’s squad for first two T20Is against Zimbabwe.
Full Details 🔽 #TeamIndia | #ZIMvINDhttps://t.co/ezEefD23D3
— BCCI (@BCCI) July 2, 2024
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन T20 सामन्यांसाठी भारताचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा.
शेवटच्या तीन T20 सामन्यांसाठी भारताचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील कुमार अहमद, मुकेश कुमार आणि तुषार देशपांडे.
