
सिमकार्डशी संबंधित नियम वेळोवेळी अपडेट केले जातात. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI चा मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (नववी सुधारणा) संबंधित नवीन नियम बरोबर दोन दिवसांनी म्हणजे 1 जुलै 2024 पासून करोडो दूरसंचार वापरकर्त्यांसाठी लागू केला जाईल.
सिम पोर्टला आता लागणार पूर्वीपेक्षा कमी वेळ, 1 जुलैपासून बदलत आहे हा नियम
नवीन नियम लागू झाल्यानंतर आता लोकांना सिमकार्ड पोर्ट करण्यासाठी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. आत्तापर्यंत मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी 10 दिवस लागायचे.
म्हणजेच आता नवीन नियम लागू झाल्यानंतर लोकांची प्रतीक्षा तीन दिवसांवर कमी होणार आहे. या नियमांबाबत भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे म्हणणे आहे की, नवीन नियमांच्या अंमलबजावणीमुळे फसवणुकीसारख्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल.
जर फोन चोरीला गेला असेल, तर एफआयआरची प्रत दिल्यानंतर यूजर्सना नवीन सिमकार्ड मिळायचे, मात्र आता 1 जुलैपासून जर एखाद्या व्यक्तीसोबत असे घडले, तर त्यांना नवीन सिमसाठीही प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रकरणात, आता सात दिवसांचा लॉक-इन कालावधी असेल, याचा अर्थ नवीन सिमसाठी तुम्हाला 7 दिवसांची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागेल.
याशिवाय ज्यांनी नुकतेच सिमकार्ड बदलले आहेत, त्यांनाही मोबाईल नंबर पोर्टसाठी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे. याचा अर्थ असा की जर तुमचा मोबाईल फोन आज चोरीला गेला असेल, तर तुम्हाला पुढील 7 दिवसांनी नवीन सिम मिळेल. हे करण्यामागचा उद्देश सिम स्वॅपिंग फ्रॉडपासून संरक्षण करणे हा आहे.
अशी अनेक प्रकरणेही समोर आली होती, ज्यामध्ये सिमकार्ड चोरीला गेल्यानंतर तोच क्रमांक अन्य काही सिमकार्डवर ॲक्टिव्हेट केल्याचे दिसून आले. यानंतर फसवणुकीची घटना घडली आहे. अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन नियम लागू केले जात आहेत.
