
T20 वर्ल्डकप सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात, इंग्लंडने वेस्ट इंडिजचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात फिल सॉल्टने तुफानी फलंदाजी करत इतिहास रचला. दुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार आणि यष्टीरक्षक जोस बटलरने आपल्या फलंदाजीत इतिहास रचला आहे. जोस बटलरला केवळ 25 धावा करता आल्या, तरी तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. हे करत बटलरने पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचा विश्वविक्रम मोडला.
T20 World Cup : जोस बटलरने मोडला T20I मधील विश्वविक्रम, हे करून त्याने जागतिक क्रिकेटमध्ये निर्माण केला दबदबा
यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रिझवानने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण 2952 धावा केल्या होत्या, आता बटलर त्याच्या पुढे गेला आहे. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून बटलरने 2967 धावा केल्या आहेत. म्हणजेच बटलर आता जागतिक क्रिकेटमध्ये विशेषतः टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करणारे यष्टिरक्षक (T20I)
- 2967 – जोस बटलर (ENG)
- 2952 – मोहम्मद रिझवान (PAK)
- 2450 – क्विंटन डी कॉक (SA)
- 1617- महेंद्र सिंग धोनी (IND)
त्याचबरोबर फिल सॉल्ट आणि जॉनी बेअरस्टो यांनी इंग्लिश संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी स्टेडियमवर इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेचे सह-यजमान वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 180 धावा केल्या.
