धुळीची अॅलर्जी घरगुती उपायांनी दूर करा


धुळीची अॅलर्जी ही धुळीमध्ये असणाऱ्या ‘डस्ट माईट्स’ शिवाय इतर अनेक गोष्टींमुळे उद्भवू शकते. ह्या अॅलर्जीच्या परिणामस्वरूप सतत शिंका येणे, हातापायांवर पुरळ येणे, डोळे लाल होणे किंवा जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अश्या निरनिराळ्या तक्रारी उद्भवू लागतात. ह्या अॅलर्जीमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी औषधे उपलब्ध असली, तरी या औषधांच्या सेवनाचे दुष्परिणाम देखील शरीरावर होतच असतात. पण ही अॅलर्जी दूर करण्यासाठी किंवा ही अॅलर्जी उद्भवणे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतील.

आपल्या आहारामध्ये दही, ताक आणि चीज सारखे पदार्थ अवश्य समाविष्ट करा. हे सर्व प्रो-बायोटिक्स आहेत. यांच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती बळकट होयास मदत होते. त्यामुळे अॅलर्जीचा त्रास सहजासहजी उद्भविणार नाही. ह्या सर्व पदार्थांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असे बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ह्या पदार्थांचे सेवन अवश्य करावयास हवे.

जैविक (organic) पद्धती वापरून तयार केलेला मध धुळीमुळे उद्भविलेल्या अॅलर्जीवर अतिशय गुणकारी आहे. जर धुळीच्या अॅलर्जीमुळे सतत शिक येत असतील, किंवा सतत खोकल्याची ढास येत असेल, तर दिवासातून तीन वेळा एक लहान चमचा मधाचे सेवन करावे. जर अॅलर्जीमुळे हातापायांना खाज सुटत असेल, किंवा पुरळ आले असेल, तर त्यावरही मधाचा पातळ थर लावावा.

अॅलर्जीचा त्रास होत असेल, तर ग्रीन टी चे सेवन करावे. ग्रीन टी मध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स शरीरामध्ये अॅलर्जीची कोणत्याही प्रकारची रीअॅक्शन रोखतात. तसेच अॅलर्जीमुळे त्वचेवर येणारी लाली, किंवा सतत सुटणारी खाज ग्रीन टी च्या वापराने कमी होते. या करिता एक चमचा ग्रीन टी ची पाने किंवा ग्रीन टीची एक टी-बॅग एक मोठा कप गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावी. हा ग्रीन टी दिवसातून तीन-चार वेळा गरम गरम प्यावा.

निलगिरीचे तेल गरम पाण्यामध्ये घालून, त्याची वाफ घेतल्याने देखील धुळीच्या अॅलर्जीमुळे उद्भविणाऱ्या सर्दी किंवा खोकल्यापासून आराम मिळतो. या तेलाच्या वाफेमुळे सायनस चे पॅसेजेस मोकळे होतात. तसेच पेपरमिंट घालून केलेला चहा देखील या अॅलर्जीमुळे होणाऱ्या सर्दी किंवा खोकाल्याकरिता अतिशय गुणकारी आहे. हा चहा किंवा काढा बनविण्यासाठी पेपरमिंट ची वाळलेली पाने २५० मिलीलीटर पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. ह्या काढ्याचे सेवन दिवसातून थोडे थोडे सतत करीत राहावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment