स्तनांच्या कर्करोगाच्या रुग्णांची संख्या भारतात लक्षणीय असून यातही स्तनांचा कर्करोग शहरी महिलांना होत असल्याच्या घटना जास्त आहे. स्तन हे शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे. दूध ब्रेस्ट टिश्यूमुळे तयार होते. टिश्यू टक्टच्या मार्फत हे निपलला जोडले जातात. डक्टमध्ये छोट्या कॅल्शिफिकेशनच्या जमा होण्याने किंवा स्तनांच्या टिश्यूमध्ये छोट्या गाठी झाल्याने ब्रेस्ट कॅन्सर हा होतो. याचे काही वेळाने कर्करोगात रुपांतर होऊ लागते. कालांतराने याचा संसर्ग लिंफोटिक चॅनल किंवा रक्त प्रवाहामार्फत शरीरातील अन्य भागांमध्ये होऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगाची स्तनाला गाठ येणे, स्तन सूजणे आणि स्तनाच्या त्वचेत बदल होणे अशी काही लक्षणे असतात.
स्तनाच्या कर्करोगाचा धोका अधिक वय, कौटुंबिक इतिहास, मासिक पाळीत त्रास, शारीरिक क्रिया न करणे, मुल न होणे, लठ्ठपणा यांसारख्या गोष्टींमुळे अधिक वाढतो. महिलांना जर वरील स्थितीपासून स्वतःला दूर ठेवायचे असेल तर डाएटमधून काही गोष्टी दूर करणे गरजेचे आहे. पण असे केल्याने स्तनाचा कर्करोग होणारच नाही हेही काही गरजेचे नाही. पण यामुळे धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. आम्ही आज तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या खाल्ल्या नाही तर कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
स्तनाच्या कर्करोग होण्याचा धोका सतत मद्यपान केल्याने वाढतो. एस्ट्रोजेनचा स्तर अल्कोहोलच्या सेवनामुळे वाढतो आणि डीएनए पेशींना नुकसान करते. महिलांमध्ये याचमुळे स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका अनेक पटींने वाढतो. एका संशोधनानुसार ब्रेस्ट ट्यूमरच्या विकासाला साखर ही मोठ्या प्रमाणात मदत करते. सॉस, स्पोर्ट्स ड्रिंक, टॉकलेट मिल्क अशा पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात साखर असते. त्यामुळे हे पदार्थ खाणे शक्यतो टाळा.
ब्रेस्ट कॅन्सर वाढण्यास प्रोसेस्ड फूडमध्ये मिळणारे फॅट हे मदत करते. बर्गर, फ्रेंच फ्राइज, चाट अशा पदार्थांमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. ब्रेस्ट कॅन्सरचा धोका फॅट, मीठ आणि प्रिझर्वेटिव्हयुक्त मटणामुळे वाढतो. रेड मीट मोठ्या प्रमाणात ज्या महिला खातात, त्यांच्यात हा आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
तुम्ही स्वतःला वाचवू शकता या सोप्या टिप्सने ब्रेस्ट कॅन्सर होण्यापासून
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही