घरी स्क्रब करून सौंदर्य उजळवा…


दिवाळी बरोबर लग्नसराईला लवकरच सुरूवात होत आहे. त्यामुळे विवाहेच्छुकांच्या प्रयत्नांना वेग आला असणार आहे. यात आकर्षक पेहरावाबरोबर सुंदर दिसणेही गरजेचं ठरतं. त्यादृष्टीने सौंदर्यप्रसाधनांच्या वापरावर भर दिला जात असला तरी त्यासाठी खर्च करण्याची साऱ्यांचीच तयारी असते असं नाही. अशा वेळी घरच्या घरी स्क्रबच्या सहाय्याने तुम्ही सौंदर्य उजळवू शकता. याच्या या टीप्स…

*बनाना स्क्रब तयार करण्यासाठी दोन पिकलेली केळी कुस्करून घ्या. त्यात साखर घाला. यात चमचाभर मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि धुवून टाका.

*हातापायांसाठी तुम्ही लेमन स्क्रब तयार करू शकता. हे स्क्रब चेहऱ्याला लाऊ नका. हे स्क्रब तयार करण्यासाठी अर्धं लिंबू घ्या. हे लिंबू साखरेत बुडवा आणि हातापायांवरून फिरवा. पाच ते सात मिनिटांनी गरम पाण्याने धुवून टाका.

*पपईचं स्क्रब तयार करण्यासाठी अर्धा कप पिकलेली पपई घ्या. पपई कुस्करून घ्या. त्यात थोडं दही घाला. लिंबाचा रस आणि मध घाला. चेहऱ्याला लावा. थोड्या वेळाने धुवून टाका.

*हनी अँड ऑरेंज स्क्रब तयार करण्यासाठी संत्र्याच्या सुकवलेल्या सालीची दोन टेबलस्पून पावडर आणि तितकेच ओट्‌स घ्या. यात मध घाला. जाडसर मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावा. पाच मिनिटांनी धुवून टाका.

*ओट्‌स आणि टोमॅटो स्क्रब तयार करण्यासाठी थोडे ओट्‌स घ्या. पिठीसाखर आणि पिकलेले टोमॅटो घ्या. टोमॅटोचे मोठे तुकडे करा. एका तुकड्यात ओट्‌स आणि साखर भरा. हा टोमॅटो चेहऱ्यावर घासा. पाच ते सात मिनिटांनी चेहरा धुवा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment